• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Former Mp Sanjay Patil Has Made An Important Appeal To Mla Rohit Patil

श्रेयवाद नको, शेतकर्‍यांसाठी एकत्र लढू; संजय पाटील यांची रोहित पाटलांना साद

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर एकत्र येऊन लढू, अशी साद माजी खासदार संजय पाटील यांनी आमदार रोहित पाटील यांना शनिवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत घातली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 10, 2025 | 02:01 PM
श्रेयवाद नको, शेतकर्‍यांसाठी एकत्र लढू; संजय पाटील यांची रोहित पाटलांना साद

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • विमानतळासाठी लोकांना फसवू नका
  • श्रेयवाद नको, शेतकर्‍यांसाठी एकत्र लढू
  • संजय पाटील यांची रोहित पाटलांना साद

सांगली : सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाच्या डावा-उजवा कालव्याच्या कामाबाबत मी खासदार असताना २०२३ मध्येच पाठपुरावा करुन गती घेतली आहे. आमदारांनी जुन्या कामाचे श्रेय घेऊन पाण्याचे राजकारण करण्याची गरज नाही. शेतकरी कोलमडून पडला आहे. राजकीय संघर्ष थांबवून शेतकरी उभा करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर एकत्र येऊन लढू, अशी साद माजी खासदार संजय पाटील यांनी आमदार रोहित पाटील यांना शनिवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत घातली.

माजी खासदार पाटील म्हणाले, सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पााच डावा-उजवा कालव्याच्या कामाबाबत मी खासदार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2023 मध्ये पाठपुरावा केला होता. त्यानंतर कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी वस्तुस्थितीबाबतचा अहवाल प्रस्तावासह दाखल केला होता. जलसंपदा विभागाकडून सिद्धेवाडी प्रकल्पाच्या डावा व उजवा कालवा विशेष दुरुस्ती कामासाठी 24.62 कोटी रुपयांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कालव्याच्या कामांबाबत मी यापूर्वीच पाठपुरावा करुन मंजूर केला आहे. त्यामुळे आमदार सिद्धेवाडी कालव्याच्या कामांचे श्रेय घेत आहेत. दुसर्‍यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे योग्य नाही.

सद्यस्थितीत तालुक्यातील शेतकरी कोलमडून पडला आहे. द्राक्ष, डाळिंबाच्या बागा तोडून टाकत आहेत. श्रेयवाद आणि इर्षेचा वाद घालून कुणाची तरी जिरवायच्या नादात राजकारण करु नये. तुम्ही खरंच काय आणलं, आपण खोटं काय-काय सांगता, हे सांगण्याची ही वेळ नाही. लोकांकडून ही संघर्ष करण्याची वेळ नाही. मतभेद थांबवून प्रश्न सोडवू, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. या कारणांनी सद्यस्थितीत शेतकर्‍यांना उभे करण्याची गरज आहे. त्यामुळे आमदारांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर एकत्र यावे, अशी साद माजी खासदार पाटील यांनी आमदार रोहित पाटील यांना घातली. सत्ता नसली तरी शेतकर्‍यांना सोबत घेवून लढा उभारण्याची गरज असल्याचे माजी खासदार पाटील यांनी सांगितले.

विमानतळासाठी लोकांना फसवू नका

कवलापूर येथे विमानतळ उभारण्यासाठी 300 ते 350 एकर जागा आवश्यक आहे. ऐवढी जागा असल्याशिवाय धावट्टी होत नाही. सध्या आपल्याकडे दीडशे ते एकशे साठ एकर जागा उपलब्ध आहे. उर्वरित जागा उपलब्ध करणे शक्य आहे का? असा सवाल करीत विमानतळासाठी लोकांना फसवण्याची भूमिका घेऊ नका, असे आवाहनही माजी खासदार पाटील यांनी केले. आम्ही अ‍ॅग्रो पोर्टची मागणी केली होती, त्यासाठी सध्याच्या जागेमध्ये आणखी चाळीस एकर जागा उपलब्ध झाल्यास अ‍ॅग्री पोर्ट उभारणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

आघाडीसाठी विश्वजीत कदम यांच्याशी लवकरच बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत यापूर्वी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांच्याशी यापूर्वी एकवेळ चर्चा झाली आहे. काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकत्र बसू, असा निरोप दिला आहे, पुढील काही दिवसात आम्ही एकत्र बसू, असे संजय पाटील यांनी सांगितले.

Web Title: Former mp sanjay patil has made an important appeal to mla rohit patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • Rohit Patil
  • sangli news
  • sanjay patil

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; ‘या’ बड्या नेत्याने दिली माहिती
1

Maharashtra Politics : अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; ‘या’ बड्या नेत्याने दिली माहिती

काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेश; जतमधील राजकीय समीकरणे बदलणार
2

काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेश; जतमधील राजकीय समीकरणे बदलणार

तासगावात भाजप स्वबळावर मैदानात उतरण्यासाठी सज्ज; संजय पाटील गटाला आव्हान
3

तासगावात भाजप स्वबळावर मैदानात उतरण्यासाठी सज्ज; संजय पाटील गटाला आव्हान

ऊस दरावर तोडगा नाहीच, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक निष्फळ; कारखान्यांना पाच दिवसाची मुदत
4

ऊस दरावर तोडगा नाहीच, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक निष्फळ; कारखान्यांना पाच दिवसाची मुदत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
त्वचेला उजाळा देणाऱ्या क्रिम्सने डॅमेज होऊ शकते Kidney! रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा, नक्की कसे जाणून घ्या

त्वचेला उजाळा देणाऱ्या क्रिम्सने डॅमेज होऊ शकते Kidney! रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा, नक्की कसे जाणून घ्या

Nov 10, 2025 | 04:03 PM
Dharmendra : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर ठेवले, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Dharmendra : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर ठेवले, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Nov 10, 2025 | 03:53 PM
Anil Jaggi new commandant of NDA: व्हाइस अ‍ॅडमिरल अनिल जग्गी ‘एनडीए’ चे नवे कमांडंट

Anil Jaggi new commandant of NDA: व्हाइस अ‍ॅडमिरल अनिल जग्गी ‘एनडीए’ चे नवे कमांडंट

Nov 10, 2025 | 03:53 PM
मराठमोळ्या दागिन्यांनी करा लग्नातील साजश्रृगांर, सेट असा करा की दिसाल सुंदर आणि क्लासी

मराठमोळ्या दागिन्यांनी करा लग्नातील साजश्रृगांर, सेट असा करा की दिसाल सुंदर आणि क्लासी

Nov 10, 2025 | 03:47 PM
तामिळ अभिनेता अभिनय यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी निधन; धनुषसोबत ‘या’ चित्रपटामधून केले पदार्पण

तामिळ अभिनेता अभिनय यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी निधन; धनुषसोबत ‘या’ चित्रपटामधून केले पदार्पण

Nov 10, 2025 | 03:46 PM
Jal Jeevan Mission Scheme: जल जीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार अन्..:५९६ अधिकारी, ८२२ कंत्राटदार आणि १५२ एजन्सी चौकशीच्या फेऱ्यात

Jal Jeevan Mission Scheme: जल जीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार अन्..:५९६ अधिकारी, ८२२ कंत्राटदार आणि १५२ एजन्सी चौकशीच्या फेऱ्यात

Nov 10, 2025 | 03:45 PM
मीरा-भाईंदरमध्ये पार्थ पवार जमीन घोटाळ्याविरोधात काँग्रेस, मनसे आणि उद्धव गट आक्रमक

मीरा-भाईंदरमध्ये पार्थ पवार जमीन घोटाळ्याविरोधात काँग्रेस, मनसे आणि उद्धव गट आक्रमक

Nov 10, 2025 | 03:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट

PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट

Nov 10, 2025 | 03:39 PM
Jalna : भोकरदन नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज! – भागवत कराड

Jalna : भोकरदन नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज! – भागवत कराड

Nov 09, 2025 | 08:48 PM
Thane : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिन्नर-नाशिक ग्रामीण भागात युवा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Thane : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिन्नर-नाशिक ग्रामीण भागात युवा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Nov 09, 2025 | 08:40 PM
Jalna : मनोज जरांगे पाटील यांनी चालवला ट्रॅक्टर; रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग

Jalna : मनोज जरांगे पाटील यांनी चालवला ट्रॅक्टर; रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग

Nov 09, 2025 | 08:30 PM
Nanded : बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Nanded : बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Nov 09, 2025 | 08:24 PM
Dhule : टीईटी निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिकेची मागणी

Dhule : टीईटी निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिकेची मागणी

Nov 09, 2025 | 08:14 PM
Nandurbar : नंदुरबारात शिवसैनिकांचा उत्साह, निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

Nandurbar : नंदुरबारात शिवसैनिकांचा उत्साह, निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

Nov 09, 2025 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.