Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas Cylinder: मोठी बातमी! आता जेवण स्वस्त होणार; गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची कपात

नागरिकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 01, 2025 | 09:07 AM
LPG Gas Cylinder: मोठी बातमी! आता जेवण स्वस्त होणार; गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची कपात
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: नागरिकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिक, लहान मोठी रेस्टॉरंट यांना दिलासा मिळाला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी गासची किंमत कंपन्यांनी २४ रुपयांनी कमी केली आहे.

सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाली आहे. गेल्या तीन महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रति एलपीजी गॅसच्या किमतीत ८० रुपयांनी कपात झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जून महिन्याच्या १ तारखेपासून २४ रुपयांनी सिलेंडरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे.

देशात व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १९०० रुपयांपेक्षा जास्त नाहीये. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट करत असताना घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही घट करण्यात आलेली नाही. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी झाल्याने जेवण स्वस्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एव्हीएशन टर्बाइन फ्यूएलच्या दरात कपात 

व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी झाले असतानाच, विमानसाठी लागणाऱ्या एव्हीएशन टर्बाइन फ्यूएलच्या दरात कपात करण्यात आली आहे. याचे दर जवळपास ४.४ टक्क्यांनी कमी झाले आहेत. विमानाचे इंधन स्वस्त झाल्याने त्याचा फायदा प्रवाशांना मिळणार हे पहावे लागणार आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात झाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळेल

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्याने रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि इतर अन्न व्यवसायांशी संबंधित लोकांना दिलासा मिळेल. हे व्यवसाय त्यांच्या दैनंदिन कामांसाठी व्यावसायिक सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

LPG Gas Cylinder: एलपीजी सिलेंडर 41 रुपयांनी स्वस्त, काय आहेत तुमच्या महानगरातील नवे दर? जाणून घ्या

दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे नवीन दर लागू

देशातील प्रमुख शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. इंडियन ऑइलची उपकंपनी असलेल्या इंडेनच्या मते, एप्रिलच्या सुरुवातीपासून नवीन दर लागू झाले आहेत.

घरगुती गॅसच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही

यावेळी फक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलण्यात आल्या आहेत. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचे दर समान आहेत. यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना दिलासा मिळेल, तर सामान्य कुटुंबांच्या स्वयंपाकघरांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

Web Title: Commercial lpg gas cylinder rate decreased in 24 rs know the rates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 08:28 AM

Topics:  

  • Commercial LPG Cylinder
  • Gas Cylinder
  • LPG price

संबंधित बातम्या

LPG सिलेंडर महाग की स्वस्त? 1 ऑगस्टला लागू होतील नवे दर
1

LPG सिलेंडर महाग की स्वस्त? 1 ऑगस्टला लागू होतील नवे दर

शहरात ऑगस्टपर्यंत पाईपलाईनने गॅस पुरवठा : राज्यात 4,000 कोटींची गुंतवणूक
2

शहरात ऑगस्टपर्यंत पाईपलाईनने गॅस पुरवठा : राज्यात 4,000 कोटींची गुंतवणूक

महिन्याच्या सुरुवातीलाच दिलासादायक बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन दर
3

महिन्याच्या सुरुवातीलाच दिलासादायक बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

Sangli News : देशभरात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, दरवाढीमुळे आंदोलन
4

Sangli News : देशभरात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, दरवाढीमुळे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.