Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kerala News: काँग्रेस नेत्याकडून शरीर सुखाची मागणी; ट्रान्सजेंडरचा गंभीर आरोप

केरळमध्ये युवा काँग्रेस नेते आणि पहिल्यांदाच आमदार झालेले राहुल ममकुथाथिल यांच्याभोवतीचे राजकीय वादळ थांबण्याचे नाव घेत नाही. राहुल यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर भाजप आणि माकपने आरोपांनंतर त्यांचा राजीनामा मागितला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 23, 2025 | 04:18 PM
Kerala News: काँग्रेस नेत्याकडून शरीर सुखाची मागणी; ट्रान्सजेंडरचा गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

Kerala News:  केरळमधील ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या अवंतिका विष्णू यांनी काँग्रेस आमदार राहुल ममकुताथिल यांच्यावर मोठा आरोप केला आहे. राहुल ममकुताथिल यांनी आपले लैंगिक शोषण केल्या आरोप अवंतिका विष्णु यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर त्यासाठी त्यांनी आपल्यावर दबाव आणल्याचाही दावा विष्णु यांनी केला आहे. राहुल ममकुताथिल यांच्या राजकीय प्रभावामुळे आपण सुरूवातीला पुढे येण्याची भिती वाटत होती. पण आपण याबाबत इतर काँग्रेस नेत्यांनाही याची कल्पना दिली होती, पण त्यानतंरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, अवंतिका विष्णु यांनी आवाज उठवल्यानंतर मल्याळम अभिनेत्री रिनी जॉर्जसह इतर महिलाही काँग्रेस राहुल ममकुताथिल यांच्या विरोधात समोर आल्या आहेत. एका मोठ्या राजकीय पक्षाचा तरुण नेता’ तिला आक्षेपार्ह संदेश पाठवत होता आणि तिला पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटण्यासाठी आग्रह करत असल्याचे रिनी जॉर्ज यांनी म्हटले आहे. पण त्याचवेळी ममकुताथिल यांनी रिनी जॉर्जचे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, राहुल ममकुताथिल यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला असून अवंतिका विष्णु आणि आरोप करणाऱ्या इतरांवर त्यांच्या विरोधीत न्यायायलाय खटला दाखल कऱण्याचा आव्हान केले आहे. ‘माझ्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या व्यक्तीला मी न्यायालयात केस सिद्ध करण्याचे आव्हान देणार असल्याचेही राहुल यांनी म्हटलं आहे.

India Richest CM: आपले मुख्यमंत्री किती “मालदार”? ADR चा अहवाल वाचून येईल भोवळ, म्हणाल पैसाच पैसा…

केरळमध्ये युवा काँग्रेस नेते आणि पहिल्यांदाच आमदार झालेले राहुल ममकुथाथिल यांच्याभोवतीचे राजकीय वादळ थांबण्याचे नाव घेत नाही. राहुल यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर भाजप आणि माकपने आरोपांनंतर त्यांचा राजीनामा मागितला आहे, तर काँग्रेसने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, गुरुवारी (२१ ऑगस्ट) ममकुथाथिल यांनी एका महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडल्याच्या आरोपानंतर राहुल ममकुताथिल यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

अवंतिका विष्णू राहुल यांची पहिली भेट

जून २०२२ मध्ये थ्रिक्काकारा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान अवंतिका आणि राहुल ममकुताथिल यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीच्या उमा थॉमस विजयी झाल्या होत्या. ‘केरळ पोटनिवडणुकीनंतर, राहुल यांनी मला फेसबुकवर हाय असा मसेज केला. तेव्हा आमची अनौपचारिक चर्चा झाली. त्यानंतर राहुल यांनी मला टेलिग्रामवर मेसेज केला आणि सेक्सची विचारणा केली. तो मला बेंगळुरू किंवा हैदराबादमध्ये भेटू इच्छित असल्याचेही अवंतिका विष्णु यांनी सांगितले.

Pune Civic Poll Row: पुणे महापालिकेतील प्रभागरचनेवरून महायुतीत मिठाचा खडा; अजित पवारांच्या

पण लैंगिक शोषणाबाबत आपण तीन वर्षे आधीच का सांगितले नाही, असं विचारले असता, आपल्या काही जवळच्या मैत्रिणींना या छळाबद्दल माहिती होती. पण आपण उघडपणे बोलण्यास घाबरत होतो, राहुल हे केरळचे प्रसिद्ध आमदार असल्याने आपल्याला भिती वाटत होती, असंही अवंतिका विष्णु यांनी सांगितलं. “मला भीती आहे की तो पुरावे नष्ट करण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर करेल. तसेच, हे प्रकरण माझ्या शब्दांविरुद्ध त्याच्या शब्दांपर्यंत जाईल अशी भीती वाटते — आणि तो एक प्रसिद्ध राजकारणी आहे,” असे तिने सांगितले. तिने सरकार आणि पोलिस प्रशासनाकडे स्वतःसाठी तसेच ट्रान्स समुदायासाठी भावनिक व कायदेशीर मदतीची विनंती केली.

गुरुवारी, रिनी जॉर्जनेही अशाच प्रकारचे आरोप करत म्हटले, “मी त्या राजकारण्याच्या संपर्कात सोशल मीडियाद्वारे आले. त्याचे आक्षेपार्ह वर्तन तीन वर्षांपूर्वी सुरू झाले, जेव्हा मला त्याच्याकडून पहिल्यांदा अश्लील संदेश आले.” तिने असा दावा केला की त्या नेत्याने तिला प्रवासाच्या निमित्ताने पंचतारांकित हॉटेलात खोली बुक करून देण्याची ऑफर दिली होती.
तिने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली होती, मात्र त्यांनी ती तक्रार दुर्लक्षित केली. इतकेच नव्हे तर, या सगळ्या गोष्टी असूनही ममकुताथिल यांना पक्षात महत्त्वाची पदे देण्यात आली.

Boxoffice वर जेमतेम कमाई मात्र मराठमोळा चेहरा चर्चेत; War 2 मधील बालकलाकाराने वेधलं सर्वांच लक्ष

“ती माझी चांगली मैत्रीण आहे आणि ती नेहमीच राहील,”

दरम्यान, ममकुताथिल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र, अवंतिका विष्णू यांच्या आरोपांवर त्यांनी अद्याप थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. पण “ती अभिनेत्री माझी मैत्रीण आहे आणि मला वाटत नाही की ज्या व्यक्तीचा ती उल्लेख करत आहे, ती मी आहे. मी आजपर्यंत देशाच्या कायद्याविरुद्ध किंवा संविधानाविरुद्ध काहीही केलेले नाही.” एका मल्याळम वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत विचारले असता, जिथे तिसऱ्या महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे, त्यावर ममकुताथिल म्हणाले, “आजच्या काळात अशा क्लिप तयार करणे काही कठीण नाही.”

Web Title: Congress leader demands physical pleasure serious allegation from transgender

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • Congress leader

संबंधित बातम्या

चेन हिसकावली, कपडे फाडले; दिल्लीत काँग्रेसच्या महिला खासदाराला लुटलं
1

चेन हिसकावली, कपडे फाडले; दिल्लीत काँग्रेसच्या महिला खासदाराला लुटलं

Nimisha Priya : आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशात गेली, पण घडलं भलतंच; निमिषाला 16 जुलैला होणार फाशी
2

Nimisha Priya : आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशात गेली, पण घडलं भलतंच; निमिषाला 16 जुलैला होणार फाशी

British F-35 Fighter Jet: तिरुवनंतपुरम विमानतळावरील ब्रिटीश एफ-३५ स्टेल्थ फायटर जेट हटवले
3

British F-35 Fighter Jet: तिरुवनंतपुरम विमानतळावरील ब्रिटीश एफ-३५ स्टेल्थ फायटर जेट हटवले

Karnataka Politics : कर्नाटकातील CM पदाचे दावेदार देशातील सर्वात श्रीमंत आमदार; अफाट संपत्तीचे मालक, कुठून येतो पैसा?
4

Karnataka Politics : कर्नाटकातील CM पदाचे दावेदार देशातील सर्वात श्रीमंत आमदार; अफाट संपत्तीचे मालक, कुठून येतो पैसा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.