पुणे महानगरपालिकेतील प्रभाग रचनेवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जनतेची नाराजी
Pune Civic Poll Row: राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून शुक्रवारी पुणे महापालिकेची प्रभागरचना जाहीर कऱण्यात आली. राज्यभरात अ,ब, क असे महापालिकेचे प्रभाग समोर आले आहे. पुण्याच्या प्रभागरचनेत यावेळी काही बदल करण्यात आले आहे. भाजप आणि शिवसेनेला याचा फायदा तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मात्र या प्रभागरचनेमुळे फटका बसणार असल्याचे दिसत आहे. ही प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
नव्या प्रभागरचनुसार पुण्यातील मध्यवर्ती प्रभागात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र उपनगरात काही बदल करण्यात आले आहेत. उपनगरात करण्यात आलेल्या फेरबदलांवरून अजित पवांरांच्या राष्ट्रवादीचे नेते सुभाष जगताप यांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत आपण अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्टरवादीत बिनसल्याची चर्चा सुरू आहे.
Pune News: सिंहगडावर गेलेला तरूण बेपत्ता की घातपात? CCTV मधल्या ‘त्या’ इसमाने आणला केसमध्ये ट्विस्ट
भाजपने त्यांना अनुकूल असलेले प्रभाग बनवले आहेत.त्याचा शिवसेनेला किती फायदा होईल हे माहित नाही. पण राष्ट्रवादीला मात्र त्याचा फटका बसणार आहे. यावर आम्ही हरकत घेणार आहोत. उपमुख्यख्यमंत्री अजित पवारांशी यावर चर्चा कऱणार आहोत. प्रभागरचनेत मध्यवर्ती भागातील प्रभागरचनेत बदल झाले नाही. पण उपनगरात मात्र मोठे बदल कऱण्यात आल्याचे सुभाष जगताप यांनी म्हटले आहे.
पुणे शहरातील समस्या विकासासाठी सोडवायला हव्यात, सत्तेसाठी नव्हे. संपूर्ण प्रभागरचना ही भारतीय जनता पक्षाला (भाजप) फायदेशीर ठरणारी आहे. काही प्रमाणात शिवसेनेलाही त्याचा लाभ होणार आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे प्रभाग वेड्यावाकड्या पद्धतीने विभागले गेले असल्याने, त्यांच्यात नाराजी पसरली आहे.
Deepti Sharma Birthday : भारतीय महिला संघाचा कणा दीप्ती शर्मा! केले आहेत ‘हे’ मोठे कारनामे
राज्य सरकारने महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग असावा, असा निर्णय घेतला. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने, प्रभागरचनेत तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या सोयीचे प्रभाग असतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आज जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेवरून केवळ भाजपचेच वर्चस्व दिसून येते.
प्रभागरचना करताना पर्वती, कसबा, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर या मध्यवर्ती भागातील विधानसभा मतदारसंघांतील प्रभागांची संख्या कमी होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. मात्र उपनगरांतील प्रभाग मोठे केल्यामुळे, तेथील नगरसेवकांची संख्या वाढण्यावर मर्यादा आली आहे. याचा थेट फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे.