पहलगाममध्ये दहशतवादी आलेच कसे? हल्ल्यानंतर पळून जाण्यास कोणी मदत केली? : गौरव गोगोईंचे संसदेत सवाल
संसदेत आजच्या (28 जुलै) मानसून अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू आहे. या चर्चेसाठी 16 तास राखीव ठेवण्यात आले होते, मात्र विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेची सुरुवात दुपारी दोननंतर झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी या ऑपरेशनबाबत माहिती दिली आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. “धर्माचं रक्षण करण्यासाठी सुदर्शन उचलावं लागतं.” असं म्हणत त्यांनी त्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या निर्णयांवर माहिती दिली.
“मग तुम्ही का…?” ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी-राजनाथ सिंह आमने-सामने; संसदेत गदारोळ
दरम्यान काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी सरकारवर जोरदार टीका करत प्रश्नांची सरबत्ती केली. पहलगामध्ये सुट्टीसाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक केलेले दहशतवादी याठिकाणी पोहोचले तरी कसे? या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा जीव गेला, तर हे दहशतवादी कोण होते आणि त्यांनी इतक्या सुरक्षित ठिकाणी प्रवेश कसा केला?, असे प्रश्न त्यांनी राजनाथ सिंह यांना विचारले.
गोगोई यांनी संसदेत विचारलं की पाच दहशतवादी भारतात कसे शिरले, त्यांचे उद्दिष्ट काय होते, आणि इतका वेळ उलटूनही सरकार त्यांना पकडण्यात अपयशी का ठरलं? तसेच, या हल्ल्यापाठोपाठ सुरू झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान सुरुवातीला निवडलेली 21 लक्ष्यस्थळं नंतर 9 वर का आणली गेली, याचं स्पष्टीकरण मागितलं.
गोगोई यांनी केंद्र सरकारला जाब विचारला की जर पाकिस्तान शरण येण्याच्या तयारीत होता, तर भारताने युद्ध का थांबवलं ? “आपण कोणासमोर झुकलो?” जर पाकिस्तान अधिकृत काश्मीर (POK) आज घेणार नसाल, तर मग कधी?, अशीही विचारणा त्यांनी केली.
जम्मू-काश्मीर सुरक्षित असल्याचा दावा केला जात असला, तरी पहलगाममधील लोक अजूनही भीतीच्या छायेत आहेत. गृहमंत्री म्हणतात की त्यांनी दहशतवाद्यांची कंबर मोडली आहे, पण तरीही पुलवामासारख्या घटना का घडतात आणि मग जबाबदारी एलजीवर टाकली जाते.”
“आमच्या नागरिकांना मारणार असाल तर मिसाईल्स…”; संसदेतून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा
ट्रंप यांनी म्हटलं होतं की अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत-पाक युद्ध थांबलं आणि काही लढाऊ विमानं पाडली गेली. त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे आणि खरोखरच भारताची किती लढाऊ विमानं पाडली गेली? याची माहिती फक्त जनतेसाठीच नव्हे तर आपल्या जवानांसाठीही उघड करावी, असं आवाहन त्यांनी सरकारला केलं.