Congress Mallikarjun Kharge letter PM Modi demands special session of Parliament on Pahalgam Terror Attack
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. यामुळे पर्यटनावर आणि जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. या हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये 48 पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहे. याचबरोबर भारत-पाकिस्तान सीमेवर देखील तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेबाबत सर्व पक्षीय बैठक झाली असून सर्व राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
पलहगामच्या या हल्ल्यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. तसेच पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. यावरुन सर्व राजकीय पक्षांनी एकच भूमिका घेतली असून योग्य कारवाईची मागणी केली आहे. तसेच या हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक देखील पार पडली आहे. दरम्यान, यावरुन संसदेमध्ये विशेष संसदीय अधिवेशन घेण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास पत्र लिहिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय आहे पत्रात?
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेले पत्र शेअर केले आहे. यामध्ये लिहिण्यात आले आहे की, “या क्षणी, जेव्हा एकता आणि बंधूता आवश्यक आहे, तेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावणे महत्त्वाचे आहे असे विरोधी पक्षांचे मत आहे. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी आपल्या सामूहिक दृढनिश्चयाचे आणि इच्छाशक्तीचे हे एक शक्तिशाली प्रदर्शन असेल. आम्हाला आशा आहे की अधिवेशन योग्यरित्या बोलावले जाईल,” अशी मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्राद्वारे केली आहे.
My letter to @PMOIndia, Shri @narendramodi, on convening a special session of both houses of the Parliament at the earliest.
“At this moment, when unity and solidarity is essential, Opposition believes that it is important to convene a special session of both houses of… pic.twitter.com/DPsGhAPJhr
— Mallikarjun Kharge (@kharge) April 29, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पीडित लोकांच्या विधानांवर संशय घेतला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “पहलगाम हल्ला हे सरकारचं अपयश नाही का? त्यावर या सरकारमधील लोक काहीच बोलत नाहीत. हे लोक काय बोलतात तर त्यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना मारले. अरे मुळात यासाठी वेळ असतो का? प्रत्येकाच्या जवळ जाऊन त्याच्या कानात बोलायला, त्याचा धर्म विचारायला वेळ असतो का? यावरून बरेच वाद आहेत काही लोक म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारला, तर काहीजण म्हणत आहेत की असं काह घडलं नाही. मुळात दहशतवाद्याचा धर्म किवा त्याची कुठलीही जात नसते,” असे मत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.