
IndiGo crisis, Congress video attack,
दरम्यान, इंडिगो क्रायसिसच्या मुद्द्यावरून काँग्रेसने त्यांच्या इन्स्टाग्रामवर उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंधित एक AI व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यात गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संभाषण दाखवण्यात आले आहे. “मोदी भाई आपने पोर्ट दिये, एअर पोर्ट दिये अब समय आ गया है एअरलाईन्स मे धंदा करने का…, इथून संभाषणास सुरूवात होते. त्यावर तुम चिंता क्यो करते होत जैसे कोयले की कमी बताकर तुम्हे पूरी खान दि थी वैसेही तुम्हे पायलटो की कमी बताकर पुरा एअर सिस्टम भी दे दुंगा. त्यानंतर मोदीजींचे एका फोनवरचे संभाषण दाखवण्यात आले आहे.
यात मोदीजी (Narendr Modi) फोनवरून, “देशमे पायलटो की कमी है ऐसा माहौल बना दो, अडानी भाई को पायलटो का सप्लायर बनाना है,” असे सांगतात. त्यावर समोरून, सर आपने अडानी को जब से कोयले काम दिया है कोयला मंहगा हुआ था, अब पायलट का काम दे रहे हो तो जनता की जेबही कट जाऐगी. अशी प्रतिक्रीया दिली जाते. या वर मोदीजी पुन्हा म्हणतात, “जितना बोला गया है उतना काम करो, जनता पर महंगाई की मार पडती है तो पडने दो, मुझे मेरे दोस्त को औरअमीर करना है,” असे संभाषण या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे.
Watch Video
भारतातील विमान वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रात मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत. देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगो अडचणीत असतानाच अदानी समूहाने महत्त्वाचा ‘गेमचेंजर’ निर्णय घेतला. अदानी डिफेन्स सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ADSTL) ने प्राइम एअरो सर्व्हिसेससोबत करार करत देशातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण आणि सिम्युलेशन कंपनी FSTC मध्ये बहुसंख्य हिस्सा खरेदी केला आहे. सुमारे ८२० कोटी रुपयांचा हा करार करण्यात आला. या करारामुळे गौतम अदानी यांचा व्यवसाय विस्तार आता केवळ विमानतळ व्यवस्थापनापुरता मर्यादित न राहता, विमान उड्डाण आणि वैमानिक प्रशिक्षण क्षेत्रातही अधिक भक्कम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अदानी समूहाने फ्लाइट सिम्युलेशन टेक्नॉलॉजी सेंटर (FSTC) मधील बहुसंख्य हिस्सा खरेदी करून विमान वाहतूक क्षेत्रात आणखी एक मोठी झेप घेतली आहे. सुमारे ८२० कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्यावर हा करार झाला असून, या अधिग्रहणामुळे संपूर्ण विमान वाहतूक बाजारात खळबळ उडाली आहे.
या व्यवहारामुळे अदानी समूहाला नागरी तसेच संरक्षण क्षेत्रासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण सेवा देणे शक्य होणार आहे. गेल्या आठवड्यात या कराराची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. आता या अधिग्रहणाचा भारतीय विमान वाहतूक क्षेत्रावर होणारा सकारात्मक परिणाम उद्योगजगताच्या नजरेत आहे.