Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Corona Virus Update: मोठी बातमी! कोरोनाने पुन्हा डोके वर काढले; ‘या’ राज्यात सापडले नवीन रूग्ण

Gujarat Corona News: मागील पाच वर्षांपूर्वी 2020 मध्ये संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा धोका वाढला होता. यामुळे हजारो रुग्णांचा मृत्यूही झाला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: May 23, 2025 | 02:41 PM
Corona Virus Update: मोठी बातमी! कोरोनाने पुन्हा डोके वर काढले; ‘या’ राज्यात सापडले नवीन रूग्ण
Follow Us
Close
Follow Us:

गुजरात: मागील पाच वर्षांपूर्वी 2020 मध्ये संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा धोका वाढला होता. यामुळे हजारो रुग्णांचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर आता कोरोनाचा नवा व्हेरियंट आशियातील अनेक देशांमध्ये पुन्हा वेगाने पसरत असल्याची माहिती दिली जात आहे. तर आता गुजरातमध्ये देखील कोरोना रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. गुजरातमध्ये 15 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.

गुजरातमध्ये 15 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरीएन्ट गंभीर नसल्याचे त्यांनी सांगितले. 15 रूग्णांवर घरच्या घरीच उपचार केले जात आहेत. डॉक्टर नीलम पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस जेएन – 1 व्हेरीएन्टच्या 15 रूग्णांची नोंद झाली आहे.

गुजरातमध्ये सापडलेले 15 रूग्ण ही ओमीक्रॉन व्हेरीएन्टचे आहेत. ओमीक्रॉन व्हेरीएन्ट 2023 ऑगस्टमध्ये भारतात समोर आला होता. मागील काही दिवसांत चीन, थायलंड सिंगापूरसारख्या देशांमध्ये कोरोनाचे अनेक रूग्ण आढळून आले आहेत. लाखों नागरिक रोज प्रवास करत असतात. त्यामुळे याचे संक्रमण भारतात देखील पसरले आहे.

कोरोनाची मोठी लाट नाही

सध्या भारतात कोरोनाची कोणतीही मोठी लाट आलेली नाही, असे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. मात्र, आशियाई देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा झपाट्याने प्रसार होत असल्याने आपण आवश्यक व योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. लसीकरणाचा सल्लाही देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसने पुन्हा डोके काढले वर; रुग्णांमध्ये होतीये झपाट्याने वाढ, पूर्वीपेक्षा सध्याचा व्हायरस…

महापालिका रुग्णालयांमध्ये विशेष सुविधा

महापालिका रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सोय आणि मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय रुग्णालये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडसह सज्ज ठेवण्यात आली आहेत.

कस्तुरबा रुग्णालयात 112 बेड तयार

रुग्णसंख्या वाढल्यास सुविधेसाठी अंधेरीच्या सेव्हन हिल्स आणि चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात 112 बेड तयार करण्यात आले आहेत. तर लक्षणे असल्यास आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, स्वतःला इतरांपासून दूर ठेवा अशी नियमावलीच पालिकेने आज जाहीर केली आहे.

भारतातही 94 रुग्ण नोंदले गेले आहेत. नव्या संसर्गामुळे चीन, हाँगकाँगसह अनेक देश सतर्क झाले आहेत. यावेळी ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट जेएन 1 आणि त्याचे उपप्रकार जेएफ7 आणि एनबी 1.8 मुळे संसर्ग झाल्याचे दिसते. सिंगापूरमध्ये सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली आहे. एप्रिलच्या शेवटी 11 हजार असलेली रुग्णांची संख्या मे महिन्याच्या सुरुवातीलाच 28 टक्क्यांनी वाढून 14 हजारांवर गेली आहे. दररोज रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या 30 टक्क्यांनी वाढत आहे.

दरम्यान, रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत. तरीही हा नवा प्रकार यापूर्वीच्या कोरोना व्हायरसपेक्षा घातक असल्याचे एकही उदाहरण आढळून आलेले नाही. मे महिन्यात आतापर्यंत भारतात केवळ 93 प्रकरणे समोर आली आहेत. मुंबईत मृत्यू झालेल्या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु, त्यांचा मृत्यू कोरोनामुळेच झाला हे सांगणे कठीण आहे.

Web Title: Corona virus 15 patients find out in state of gujarat health news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • Corona Virus
  • Gujarat
  • Omicron Virus

संबंधित बातम्या

Nitin Gadkari : “चूक झाली तर मी त्यांना सोडणार…”, गुजरात पूल दुर्घटनेप्रकरणी नितीन गडकरींचा कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना इशारा
1

Nitin Gadkari : “चूक झाली तर मी त्यांना सोडणार…”, गुजरात पूल दुर्घटनेप्रकरणी नितीन गडकरींचा कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना इशारा

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ व्यक्तव्याने पाटीदार समाज नाराज? गुजरात भाजप म्हणाले, “त्यांनी काँग्रेसची…”
2

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ व्यक्तव्याने पाटीदार समाज नाराज? गुजरात भाजप म्हणाले, “त्यांनी काँग्रेसची…”

Eknath Shinde : ‘ते काय पाकिस्तानात आहेत का? त्यांचंही योगदान….’; जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3

Eknath Shinde : ‘ते काय पाकिस्तानात आहेत का? त्यांचंही योगदान….’; जय गुजरातची घोषणा दिल्यानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde Jay Gujarat : “जय गुजरात…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात घोषणा, वाद पेटणार
4

Eknath Shinde Jay Gujarat : “जय गुजरात…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात घोषणा, वाद पेटणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.