Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyclone News: सावधान! ‘सायक्लोन मोंथा’ची तबाही अटळ! ‘या’ किनारपट्टीवर कधीही धडकणार? ३ राज्यांमध्ये रेड-ऑरेंज अलर्ट जारी

२५ ऑक्टोबरला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले, जे २६ ऑक्टोबरला डीप डिप्रेशन मध्ये बदलले आहे. २७ ऑक्टोबरच्या सकाळी हे चक्रीवादळात रूपांतरित होऊन पुढे सरकेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 26, 2025 | 02:42 PM
सावधान! 'सायक्लोन मोंथा'ची तबाही अटळ! 'या' किनारपट्टीवर कधीही धडकणार? (Photo Credit- X)

सावधान! 'सायक्लोन मोंथा'ची तबाही अटळ! 'या' किनारपट्टीवर कधीही धडकणार? (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • बंगालच्या उपसागरात ‘मोंथा’ चक्रीवादळ अधिक तीव्र
  • २८ ऑक्टोबरला काकीनाडाजवळ लँडफॉलची शक्यता
  • १०० किमी वेगाने वारे वाहणार.

Cyclone Montha to Hit: भारतीय समुद्रातील बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) सक्रिय झालेले ‘मोंथा’ (Montha) चक्रीवादळ आता अधिक तीव्र झाले असून, ते पूर्व किनारपट्टीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडू या ३ राज्यांमध्ये सोसाट्याचे वारे आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मच्छिमारांना तातडीने समुद्रातून परत येण्याचे आणि किनारपट्टीपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या वादळाचा परिणाम ३० ऑक्टोबरपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे.

वादळाची सद्यस्थिती आणि संभाव्य लँडफॉल

२५ ऑक्टोबरला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले, जे २६ ऑक्टोबरला डीप डिप्रेशन मध्ये बदलले आहे. २७ ऑक्टोबरच्या सकाळी हे चक्रीवादळात रूपांतरित होऊन पुढे सरकेल. २८ ऑक्टोबरच्या सकाळी हे चक्रीवादळ आपल्या शिखरावर पोहोचेल आणि सायंकाळी किंवा रात्री आंध्र प्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावर काकीनाडाजवळ धडकू शकते. लँडफॉलच्या वेळी ९० ते १०० किलोमीटर प्रति तास वेगाने तुफानी वारे वाहतील, ज्याचा वेग ११० किलोमीटर प्रति तासपर्यंत पोहोचू शकतो. काल सायंकाळी हे वादळ विशाखापट्टणमपासून ४२० किलोमीटर दक्षिण-पश्चिम दिशेला होते आणि १० किलोमीटर प्रति तास वेगाने पुढे सरकत होते.

Rain Forecast of Cyclone Montha for the next 4 days from 26th Oct @4.30am GMT – https://t.co/SVcl3LPslN pic.twitter.com/CEv8sLplWl — Jolly Mampilly (@jollymampilly) October 26, 2025

Tropical Cyclone: बलाढ्य चीनला चक्रीवादळाचा मोठा फटका! 170 प्रतितास वेगाने वारा थेट…

या राज्यांमध्ये वादळाचा मोठा परिणाम

१. आंध्र प्रदेश (रेड अलर्ट)

  • श्रीकाकुलम, विजयनगरम, काकीनाडा या तटीय जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
  • वादळामुळे येथे २० ते ३० सेंटीमीटरपर्यंत अतिवृष्टी होण्याची आणि पूर येण्याची शक्यता आहे.
  • मुख्य सचिवांनी हाय अलर्ट जारी करून सायक्लोन शेल्टर्स तयार केले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला असून, तटीय भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

२. ओडिशा (ऑरेंज अलर्ट)

  • गंजाम, बालासोर, कोरापुटसह सुमारे ३० जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
  • येथे १५ ते २५ सेंटीमीटरपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
  • वाऱ्याचा वेग ११० किलोमीटर प्रति तासपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे ओडिशामध्ये आपत्कालीन व्यवस्थापन मोड सक्रिय करण्यात आले असून, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

३. तामिळनाडू (ऑरेंज अलर्ट)

  • चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लूरसह सर्व समुद्र तटीय जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी आहे.
  • वादळामुळे येथे १२ ते २० सेंटीमीटरपर्यंत जोरदार पाऊस होऊ शकतो.
  • ९ बंदरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पम्बन येथे ‘स्टेज वन’ ची सायक्लोन वॉर्निंग जारी झाली आहे.

इतर राज्यांवर परिणाम

तेलंगाना, रायलसीमा, छत्तीसगडमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी असून, २७ ते २९ ऑक्टोबरपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे केरळ आणि कर्नाटकातही हलक्या ते मध्यम पावसाचा ‘यलो अलर्ट’ राहील आणि समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि ओडिशाच्या मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन एनडीआरएफ (NDRF) च्या तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

Cyclone Alert: काळ बनून येतोय चक्रीवादळ! पुढील २४ तासांत ११ राज्यांवर कोसळणार; ४ राज्यांसाठी IMD चा ‘विनाशकारी’ इशारा

Web Title: Cyclone montha landfall date andhra coast alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • Cyclone
  • imd

संबंधित बातम्या

Cyclone Alert: काळ बनून येतोय चक्रीवादळ! पुढील २४ तासांत ११ राज्यांवर कोसळणार; ४ राज्यांसाठी IMD चा ‘विनाशकारी’ इशारा
1

Cyclone Alert: काळ बनून येतोय चक्रीवादळ! पुढील २४ तासांत ११ राज्यांवर कोसळणार; ४ राज्यांसाठी IMD चा ‘विनाशकारी’ इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.