
हवामान बदलणार! राज्यात थंडीचा जोर कमी, कसा होणार परिणाम? जाणून घ्या सविस्तर अपडेट
हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव आणि निरभ्र आकाशामुळे रात्री उष्णतेचा अपव्यय वाढला आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवस मुंबईत रात्री व पहाटे थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यातही महाराष्ट्रात पहाटेच्या थंडीचा प्रभाव कायम असून, अंतर्गत भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले जात आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात सकाळच्या वेळेत गारठ्याची जाणीव होत आहे.
कोकण पट्टयात तुलनेने उबदार स्थिती असूनही रात्री व पहाटे थंडी जाणवत आहे. रत्नागिरी (१६.२ अंश), डहाणू (१५.३ अंश) आणि हरनाई (१९ अंश) येथेही थंड हवामान कायम आहे.
महाराष्ट्रातील तापमानात पुढील तीन दिवसांत हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र २३-२४ जानेवारी दरम्यान काही भागांत किमान तापमानात थंडीची हलकी झुळूक जाणवू शकते. त्यानंतर पुन्हा दोन ते तीन दिवस तापमानात क्रमाक्रमाने वाढ होण्याचे संकेत आहेत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
अहिल्यानगर – १४.६
बीड – १५
महाबळेश्वर- १३.१
जळगाव – ११.८
नाशिक – ११.४