Defence Minister Rajnath Singh gives update on Indo-Pak war and Operation Sindoor
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागल्यानंतर देखील सीमा भागांमध्ये मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. शस्त्रविराम लागला असला तरी देखील कोणताही हल्ला केल्याचा आक्रमक उत्तर देण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यानंतर आता दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सीडीएस, तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन पाकिस्तानला इशारा दिला आहे. राजनाथ सिंह यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, भारतविरोधी आणि दहशतवादी संघटनांनी भारत मातेवर हल्ला करुन अनेक परिवारांचे सिंदूर पुसले होते त्यांना भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर करुन न्याय देण्याचे काम केले आहे. आणि याच गोष्टीसाठी आज संपूर्ण देश भारतीय सेनेचे अभिनंदन करत आहे, अशा भावना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केल्या आहेत.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi chairs a meeting at 7, LKM. Defence Minister Rajnath Singh, EAM Dr S Jaishankar, NSA Ajit Doval, CDS, Chiefs of all three services present. pic.twitter.com/amcU1Cjmbu — ANI (@ANI) May 11, 2025
भारत पाकिस्तान युद्धाबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर ही फक्त एक सैन्य कारवाई नाही तर भारताची राजनैतिक, सामाजिक आणि समर्थवान इच्छाशक्तीचे प्रतिक आहे. हे ऑपरेशन दहशतवादाविरोधात सैन्यशक्तीचे आणि संकल्पाचे प्रतिक आहे. आपण दाखवून दिले आहे की, भारत दहशतवादाविरोधात जी कोणती कारवाई करेल त्यावेळी दशतवादी आणि त्यांच्या आकांसाठी सीमा पार असलेली जमीन सुद्धा सुरक्षित राहणार नाही. भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळ उद्धवस्त करण्याच्या हेतूने तयार करण्यात आले होते, असे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.
‘आपरेशन सिंदूर’ सिर्फ़ एक सैन्य कार्रवाई भर नहीं है, बल्कि भारत की राजनीतिक, सामाजिक और सामरिक इच्छाशक्ति का प्रतीक है। हमारे प्रधानमंत्री श्री @narendramodi ने स्पष्ट कर दिया है कि यह नया भारत है जो आतंकवाद के ख़िलाफ़ सरहद के इस पार और उस पार दोनों तरफ़ प्रभावी कारवाई करता है। pic.twitter.com/Lmoj3MrYey — Rajnath Singh (@rajnathsingh) May 11, 2025
पुढे राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही त्यांच्या सामान्य नागरिकांना कधीच निशाण्यावर धरले नाही. मात्र पाकिस्तानने फक्त भारतातील सामान्य नागरिक नाही तर प्रार्थना स्थळांवर निशाणा साधला. मंदिर, गुरुद्वारा याच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सेनेने पराक्रम आणि शौर्याच्या बळावर संयम देखील दाखवून दिला. तसेच पाकिस्तानच्या अन्य काही ठिकाणांवर प्रहार करुन सडेतोड उत्तर दिले आहे, अशी भूमिका राजनाथ सिंह यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी सांगितले की, आम्ही केवळ सीमा भागामध्ये जवळ असलेल्या भागांवर कारवाई केली नाही तर भारतीय सेनेची धमक ही रावळपिंडीपर्यंत पोहचली जिथे पाकिस्तानी सैन्याचे हेडकॉटर आहे. भारतामध्ये दहशतवादी घटना करण्याचे काय परिणाम होतील हे पूर्ण जगाचे उरीच्या घटनेनंतर पाहिले होते. पुलवामानंतर आपल्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केली. आणि आता पहलगामच्या घटनेनंतर संपूर्ण विश्व बघत आहे की, भारत पाकिस्तानमध्ये घुसून मल्टिपल स्ट्राईक केल्या आहेत. आतंकवादाच्या विरोधात शून्य सहनशीलताच्या मार्गावर चालताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की, हा नवीन भारत आहे. हा आतंकवादींविरोधात सीमांमध्ये आणि सीमापार जाऊन प्रभावी कारवाई करणार आहे हे स्पष्ट स्वरुपात पंतप्रधानांनी सांगितले आहे, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.