काश्मीर मुद्द्यात डोनाल्ड ट्रम्प यांची ढवळाढवळ; भारत पाकिस्तानची समस्या सोडवणार असल्याचा केला दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी (10 मे) युद्धबंदी करण्यात आली. याची घोषाणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धविरामासाठी सहमती दर्शवली आहे. याचा मला आनंद होत आहे. तसेच त्यांनी सांगितले की, यामध्ये अमेरिकेने मध्यस्थी करुन दोन्ही देशांत युद्धबंदी घडवून आणली. त्यांच्या या घोषणेनंतर भारत सरकार आणि पाकिस्तनान याची पुष्टी केली.
दरम्यान आता ट्रम्प यांनी काश्मीरबद्दल एक मोठा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीवर भाष्य केले आहे.
ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “भारत आणि पाकिस्तान यांच्या नेतृत्वाचा मला अभिमान वाटतो. चार दिवसांच्या युद्धानंतर दोन्ही देशांना आता युद्ध थांबवण्याची गरज आहे, याचे शहाणपण त्यांच्यात आले आहे. युद्ध असेच सुरु राहिले असते, तर लाखो लोकांचा बळी गेला असता.
अनेक निष्पाप लोक मृत्यूमुखी पडले असते. मोठा विनाश झाला असता. तसेच मला अभिमान आहे की अमेरिकेच्या मदतीने भारत आणि पाकिस्तानमध्ये एक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेण्यात आला. ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की, मी दोन्ही देशांसोबत व्यापर वाढवण्यावर भर देणार आहे.
तसेच ट्रम्प यांनी असाही दावा केला आहे की, दोन्ही देशांमध्ये काश्मीर समस्येवरही तोडगा काढणार आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी दोन्ही देशांसोबत काश्मीर मुद्यावरही चर्चा करणार आहे. हजार वर्षानंतर काश्मीर मुद्यावर चर्चा होणार, यावर तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे ही चर्चा करु असे ट्रम्प यांनी म्हटले. यासाठी देव भारत आणि पाकिस्तानला चांगल्या नेतृत्त्वासाठी आशिर्वाद देवो. असेही ट्रम्प यांनी म्हटले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये सायंकाळी 5.30 वाजता युद्धबंदीचा दावा केला होता. यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिवांनी याची अधिकृत घोषणा केली. दरम्यान भारताने सांगितले की, युद्धबंदीबाबत देशांमध्ये स्पष्टपणे देशांदरम्यान झाले आहे. दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये याबाबत चर्चा झाली आणि युद्धबंदी लागू करण्यात आली.
भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा लागू केल्यानंतर शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. तथापि, पाकिस्तानने अवघ्या तीन तासानंतर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमांवर हल्ला केला. तसेच गुजरातच्या कच्छवरही ड्रोन हल्ले केले. भारताने देखील या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच भारत सरकारने सैन्याला योग्य कारवाईचे आदेश दिले आहेत.