Delhi CM BJP Rekha Gupta admits EVM machine hack
Rekha Gupta admits EVM Hack : नवी दिल्ली : देशामध्ये सध्या मतचोरीचा मुद्दा जोरदार गाजला आहे. विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. लोकसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणूकांमध्ये सत्ताधारी पक्ष हा मतदान करण्यात येणारी ईव्हीएम मशीन हॅक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कॉंग्रेसने याविरोधात आवाज उठवला आहे. मात्र हे सर्व आरोप भाजप आणि निवडणूक आयोगाने अनेकदा फेटाळले असून हे शक्य नसल्याचे सांगितले आहे. यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या रेखा गुप्ता यांनी ईव्हीएम मशीनच्या हॅकिंगबाबत वक्तव्य केले. मात्र त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी या आरोपींना मान्यता दिली असल्याचा दावा केला जात आहे.
भाजप नेत्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता हा चर्चेमध्ये आल्या आहेत. रेखा गुप्ता यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये उत्तर देताना त्यांनी ईव्हीएम मशीनबाबत मत व्यक्त केले. मात्र यावेळी त्यांनी बोलताना ईव्हीएम मशीन हॅक केली जात असल्याचा आरोप एकप्रकारे आपल्या वक्तव्यातून मान्य केला असल्याचा दावा आपने केला आहे. आम आदमी पक्षाने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी आपने लिहिले आहे की, दिल्लीच्या मुख्यमंत्री स्वतः कबूल करत आहेत की त्यांनी ईव्हीएम हॅक केल्या आहेत, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाल्या आहेत रेखा गुप्ता?
वाहिनीच्या प्रतिनिधी म्हणाल्या की, विरोधक दावा करत आहेत की ईव्हीएमच्या कृपेने भाजपा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (भाजपाची विद्यार्थी शाखा) आणि त्यांचे मित्रपक्ष निवडणुका जिंकत आहेत निवडणूक आयोगही तुमच्याच बाजूने आहे. यावर रेखा गुप्ता म्हणाल्या, “७० वर्षांपासून ते लोक (काँग्रेस) ईव्हीएम हॅक करत होते तर त्यांना काही फरक पडत नव्हता, आता आम्ही केले तर त्यांना वाईट वाटतंय, हे चांगलयं.., असे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे एका अर्थाने त्यांनी राहुल गांधी यांचा मतचोरीचा आणि ईव्हीएम मशीन हॅक केली जात असल्याचा आरोप मान्य केला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
दिल्ली की सीएम ये क्या कह रही हैं … pic.twitter.com/ZEf8RQVuzE
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 21, 2025
महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारतात २००४ पासून आतापर्यंत पाच लोकसभा निवडणुका या ईव्हीएमवर घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत. २००४ च्या आधी भारतात मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेतल्या जात होत्या. यामुळे कॉंग्रेसकडून जोरदार टीका केली जात आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतचोरी झाली असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत मोठे दावे केले आहेत. यामध्ये एकाच व्यक्तीच्या नावे विविध राज्यांमध्ये मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मृत व्यक्तीच्या नावाने काही ठिकाणी मतदान झाले आहे तर जीवंत व्यक्तींना मृत दाखवण्यात आले आहे. कॉंग्रेस समर्थक लोकांना मतदान यादीतून वगळण्यात आले असल्याचा आरोप देखील राहुल गांधींकडून केला जात आहे. तर हे सर्व आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले असून हे सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. मात्र आता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.