Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभेआधी केजरीवालांचा खळबळजनक दावा; म्हणाले, "येत्या काळात सिसोदियांच्या..."
Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आपसह सर्व राष्ट्रीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष वेगळा आणि कॉंग्रेस स्वबळावर निवडणूका लढवणार आहेत. प्रचार सभांचा जोर वाढला असून टीका टिप्पणी केली जात आहे. या दरम्यान भाजप विरुद्ध आम आदमी पक्ष यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘एक्स’ वर एक खळबळजनक दावा केला आहे. हे प्रकरण नेमके काय आहे? आणि केजरिवाल यांनी काय पोस्ट केली आहे ते जाणून घेऊयात.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत येत्या काही दिवसांमध्ये मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआय छापेमारी करणार आहे, असा मोठा दावा केला आहे. त्यांनी एक्सवर लिहिले की, “mआय काही दिवसांपूर्वी म्हणालो होतो की, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अटक होईल आणि आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यावर छापे टाकले जातील. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये सीबीआय मनीष सिसोदीया यांच्या घरी छापा टाकणार आहे.”
पुढे आपल्या पोस्टमध्ये केजरीवाल म्हणाले, “दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होत आहे. अटकेचे सत्र आणि छापेमरी हे त्याचेच परिणाम आहेत. आजवर त्यांना आमच्याविरुद्ध काही सापडले नाही. यापुढे देखील सापडणार नाही. ‘आप’ हा एक प्रामाणिक पक्ष आहे.”
मैंने कुछ दिन पहले बोला था कि दिल्ली CM आतिशी जी को गिरफ्तार किया जाएगा और “आप” के कुछ नेताओं पर रेड होगी।
विश्वस्त सूत्रों के मुताबिक मनीष सिसोदिया जी के घर अगले कुछ दिनों में सीबीआई रेड होगी।
बीजेपी दिल्ली चुनाव हार रही है। ये गिरफ्तारियां और रेड उनकी बौखलाहट का नतीजा है।…
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 6, 2025
केजरीवालांच्या ‘शीशमहल’वर ३३ कोटींचा खर्च; PM नरेंद्र मोदींची सडकून टीका
दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी कॅगचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर राजधानी दिल्लीचं राजकारण चांगलंच तापलं आहे. या अहवालात आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्ती आणि सुशोभिकरणावर झालेल्या खर्चाचा तपशील दिला आहे. नुतनीकरणाचा खर्च तब्बल ३३.६६ कोटींवर गेल्याचं या अहवालात म्हटलं असून त्यावरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केजरीवाल यांच्यावर घणाघाती टीका केली.
हेही वाचा: केजरीवालांच्या ‘शीशमहल’वर ३३ कोटींचा खर्च; PM नरेंद्र मोदींची सडकून टीका
दिल्लीत भाजपाच्या परिवर्तन मेळाव्यात बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज एका मोठ्या वृत्तपत्रात अरविंद केजरीवाल यांच्या शीश महलवर झालेल्या खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. कॅगच्या अहवालात नमूद केलेल्या आकडेवारीवर ही बातमी आहे. करोना महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण देश झगडत होता. तेव्हा आम आदमी पक्ष शीश महाल बांधण्यात व्यस्त होता.
हेही वाचा: Phalodi Satta Bazar: कोण करणार दिल्लीवर राज्य? फलोदी सट्टा बाजाराने उडवली ‘या’ पक्षांची झोप
कोण करणार दिल्लीवर राज्य? फलोदी सट्टा बाजाराने उडवली ‘या’ पक्षांची झोप
लोकसभा निवडणुकीत फलोदी सट्टा बाजाराने काही अंदाज वर्तवला होता. आता फलोदी सट्टा बाजाराने दिल्ली विधानसभेसाठी देखील काही अंदाज वर्तवले आहेत. राजस्थानच्या फलोदी सट्टा बाजाराची भविष्यवाणी खरी ठरल्यास यंदा दिल्लीमध्ये चित्र संपूर्णपणे बदलले दिसू शकते. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार काहीसे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी कॉँग्रेसची मदत घ्यावी लागेल. तर भाजप हा एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयास येईल. मात्र जराही काही इकडे तिकडे झाल्यास दिल्लीत भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. अर्थात फलोदी सट्टा बाजाराने हे अंदाज वर्तवले आहेत. नक्की काय निकल येणार हे निवडणुकीतच कळणार आहे.