दिल्लीत कोणाची सत्ता येणार? (फोटो - टीम नवराष्ट्र)
Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आपसह सर्व राष्ट्रीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष वेगळा आणि कॉंग्रेस स्वबळावर निवडणूका लढवणार आहेत. प्रचार सभांचा जोर वाढला असून टीका टिप्पणी केली जात आहे. प्रचार सभांमध्ये भाजप विरोधी आम आदमी पक्ष अशी चुरशीची लढत दिसून येत आहे. निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक घोषित करू शकते. फेब्रुवारीत निवडणूक होऊ शकते. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता फलोदी सट्टा बाजारने देखील आपला अंदाज वर्तवला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने 70 पैकी 70 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर कॉँग्रेस पक्षाने देखील 70 पैकी 47 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही पक्ष दिल्लीत मोठ्या ताकदीने प्रचार करत आहेत. मात्र भाजपने अजून आपला गेम उघड केलेला नाही. मात्र भाजपने प्रचारास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रचाराचा शुभारंभ केला आहे.
काय आहे फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज?
लोकसभा निवडणुकीत फलोदी सट्टा बाजाराने काही अंदाज वर्तवला होता. आता फलोदी सट्टा बाजाराने दिल्ली विधानसभेसाठी देखील काही अंदाज वर्तवले आहेत. राजस्थानच्या फलोदी सट्टा बाजाराची भविष्यवाणी खरी ठरल्यास यंदा दिल्लीमध्ये चित्र संपूर्णपणे बदलले दिसू शकते. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार काहीसे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी कॉँग्रेसची मदत घ्यावी लागेल. तर भाजप हा एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयास येईल. मात्र जराही काही इकडे तिकडे झाल्यास दिल्लीत भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. अर्थात फलोदी सट्टा बाजाराने हे अंदाज वर्तवले आहेत. नक्की काय निकल येणार हे निवडणुकीतच कळणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आपसह सर्व राष्ट्रीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष वेगळा आणि कॉंग्रेस स्वबळावर निवडणूका लढवणार आहेत. प्रचार सभांचा जोर वाढला असून टीका टिप्पणी केली जात आहे. प्रचार सभांमध्ये भाजप विरोधी आम आदमी पक्ष अशी चुरशीची लढत दिसून येत आहे. अरविंद केजरीवास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. यामध्ये आता दिल्ली विधानसभा निवडणूकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत संपूर्ण देशामध्ये चर्चा सुरु आहे. संपूर्ण देशभरातून दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे लक्षात लागले आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष तिसऱ्यांदा हॅट ट्रीक करण्यास यशस्वी होणार का? य़ाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय निवडणूक आयोग 7 किंवा 8 जानेवारीला दिल्ली निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. दिल्लीत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होणार असून 15 फेब्रुवारीनंतर निकाल लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.