Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Politics: खासगी शाळांच्या मनमाफी फी वाढीला लागणार लगाम..; दिल्लीत लागू होणार ‘फी कायदा’

दिल्लीतील खासगी शाळांनी केलेल्या मनमानी फीवाढीवर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने शाळा फी नियंत्रणासाठी मोठा निर्णय घेतला आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 29, 2025 | 04:23 PM
Delhi Politics: खासगी शाळांच्या मनमाफी फी वाढीला लागणार लगाम..; दिल्लीत लागू होणार ‘फी कायदा’
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत खासगी शाळांकडून होणाऱ्या मनमानी फीवाढीवर आता लगाम बसणार आहे. दिल्लीतील भाजप सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून ‘दिल्ली फी अ‍ॅक्ट’ ला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या नव्या कायद्यामुळे फी वाढवताना आता खासगी शाळांना मनमानी करता येणार नाही. राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आता हा विधेयक विधानसभेत मांडण्यात येणार आहे. विधानसभेत हे विधेयक संमत झाल्यास हा कायदा दिल्लीत लागू होईल. या कायद्यामुळे शाळा कोणत्याही प्रकारची फी वाढ करताना सरकारच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक ठरणार आहे.

फी वाढीमुळे पालक त्रस्त

मागील काही महिन्यांत खासगी शाळांनी अचानकपणे आणि मोठ्या प्रमाणात शैक्षणिक शुल्क वाढवले. या पार्श्वभूमीवर अनेक पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका सर्वेनुसार, ४२ टक्के पालकांनी मान्य केले की गेल्या तीन वर्षांत शाळांच्या फीमध्ये ५० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या विरोधात दिल्ली शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर पालकांनी आंदोलनही केले होते. राष्ट्रीय राजधानीतील खासगी, अनुदान न घेणाऱ्या शाळांमधून ‘अनियमित व अवाजवी’ फीवाढीबाबत पालकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. आता सरकारच्या या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Mumbai News: लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा मोठा प्लॅन…? पोलिसांनी उधळला मोठा कट

दिल्लीतील खासगी शाळांनी केलेल्या मनमानी फीवाढीवर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने शाळा फी नियंत्रणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्री आशीष सूद यांनी मांडलेले ‘स्कूल फी अ‍ॅक्ट’ दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. आता हे विधेयक विधानसभेत सादर करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी अलीकडेच खासगी शाळांच्या शुल्कवाढीबाबत नाराजी व्यक्त करताना सांगितले होते की, शिक्षण क्षेत्रात कोणताही व्यावसायीकरणाचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. नवीन सरकार दिल्लीतील विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षणमंत्र्यांचा विरोधी पक्षावर आरोप

शिक्षण मंत्री आशीष सूद यांनी यासंदर्भात बोलताना, शाळा म्हणजे विद्येची मंदिरे आहेत, असे म्हटले. त्यांनी आरोप केला की, मागील सरकारने खासगी शाळांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला. माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर निशाणा साधत सूद म्हणाले की, जर त्यांच्याकडे भ्रष्टाचारासंबंधी कोणतेही पुरावे असतील, तर त्यांनी थेट माध्यमांसमोर येऊन त्याचे स्पष्टीकरण द्यावे, सरकारवर खोटे आरोप करू नयेत.हा निर्णय पालकांच्या अनेक वर्षांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला असून, लवकरच हा कायदा अमलात येण्याची शक्यता आहे.

Sitaare Zameen Par: चित्रपटाची ट्रेलर रिलीज डेट ढकलली पुढे, का घेतला अभिनेत्याने हा निर्णय?

Web Title: Delhi politics arbitrary fee hikes in private schools will be curbed fees act to be implemented in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • BJP Government
  • Delhi Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.