Photo credit- Social Media लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा मोठा प्लॅन...? पोलिसांनी उधळला मोठा कट
मुंबई: गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिश्नोई गँगने गोळ्या घालून हत्या केली. त्यांच्या हत्येपूर्वी अभिनेता सलमान खानच्या बंगल्याबाहेरही या गँगकडून गोळीबार करण्यात आला होता. महाराष्ट्रासह इतर राज्यातील अनेक सेलिब्रिटी या गँगच्या हिटलिस्टवर आले आहेत. आता ही गँग अजून काहीतरी मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आल. बिश्नोई गँगचे मोठे आव्हान आल्यामुळे राज्यातील पोलीस दलही हाय अलर्टवर आले आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अंधेरी परिसरातून बिश्नोई गँगच्या पाच शूटरना अटक केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी सात बंदुका आणि २१ जिवंत काडतूस जप्त केली आहेत. तपासादरम्यान एक महत्त्वाचा खुलासाही समोर आला आहे. अटक करण्यात आलेला एक आरोपी विकास ठाकुर याने चौकशीदरम्यान कबुली दिली आहे. आपण कुख्यात बिश्नोई गँगच्या संपर्कात होतो. असं त्याने कबूल केलं आहे. पोलिस तपास यापुढे या गँगच्या मुंबईतील हालचाली आणि स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांशी असलेल्या संबंधांचा शोध घेतला जात आहे.
Mumbai Accident: ट्रक आणि ती समोरासमोर, चाक डोक्यावरून गेले अन्….काळीज पिळवटणारा अपघात
मुंबई पोलिसांनी अंधेरी परिसरातून अटक केलेल्या पाच शूटरांविरोधात मोठा कट उघडकीस आला आहे. हे पाचही शूटर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या आदेशानुसार मुंबईत दाखल झाले होते का, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिस तपासातून असेही उघड झाले आहे की या टोळीला मुंबईत एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता आणि हल्ल्याची अंतिम माहिती गँगकडून प्रत्यक्ष भेटीत देण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि संभाव्य मोठा गुन्हा टाळण्यात यश मिळवले.
सूत्रांच्या माहितीनुसार, या शूटरांना हल्ल्यानंतर ५० लाख रुपयांची सुपारी देण्याचे आश्वासन दिले गेले होते. तथापि, ही सुपारी नेमकी कोणी दिली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पोलिस तपासात असेही समोर आले आहे की, या कटाचा उद्देश मुंबईतील एका नामांकित व्यापाऱ्याची हत्या करणे हा होता.
मोठी बातमी ! हिंगण्यात राष्ट्रवादीला खिंडार; सर्व नगरसेवकांसह 16 सरपंचाचा भाजपमध्ये प्रवेश
विकास ठाकूर उर्फ विक्की, सुमित कुमार दिलावर, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेक गुप्ता. हे सर्व आरोपी राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यापैकी सुमित कुमार आणि विकास ठाकूर हे हिस्ट्रीशीटर असून त्यांच्याविरोधात आधीपासूनच गुन्हे नोंद आहेत. हे आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. विशेषतः, अभिनेता सलमान खानला सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे बिश्नोई गँग आधीपासूनच सुरक्षा यंत्रणांच्या रडावर आली आहे. अशा पार्श्वभूमीवर या पाच जणांची अटक व त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केल्यामुळे मुंबईतील व्यापारी आणि सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.