Hathras Case
हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये 120 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने देशभरात दु:ख व्यक्त केले जात होते. या घटनेनंतर यातील मुख्य आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. असे असतानाच आता हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याने अखेर आत्मसमर्पण केले असून, त्याला पोलिसांनी अटक केली.
हाथरस येथे भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम झाला होता. याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली. यात 120 पेक्षा जास्त जणांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर देव प्रकाश मधुकर याला मुख्य आरोपी करण्यात आले होते. जिथे भोले बाबा आणि त्याचा साथीदार मधुकर हे दोघे घटनेनंतर अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्याला पकडण्यासाठी बाबा मधुकर याच्यावर पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले होते. पोलिस यंत्रणा त्याच्या शोधावरही होत्या.
दरम्यान, मधुकरला अटक न झाल्यामुळे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यात आता देव प्रकाश मधुकर याने अखेर आत्मसमर्पण केले असून, त्याला आता पोलिसांनी अटक केली.
मधुकर याच्या वकिलाचा दावा
या प्रकरणी मधुकरचे वकील ए. पी. सिंह यांनी मधुकरने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचा मोठा दावा केला आहे. हाथरस अपघातातील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला दिल्लीतील नजफगड येथून अटक करण्यात आली आहे.