कावड यात्रेत त्रिशूळ, डीजे आणि सायलेन्सर नसलेल्या दुचाकींवर बंदी; नियम मोडल्यास कठोर कारवाई होणार
उत्तर प्रदेश सरकारने श्रावण महिन्यात होणाऱ्या कावड यात्रेबाबत अतिशय सावधगिरी बाळगली आहे. हिंदू धर्मियांची अपार श्रद्धा असलेल्या या मोठ्या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मेरठ झोन अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्याही कावड यात्रेकरूला काठी, त्रिशूळ घेऊन चालण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश पोलिस प्रशासनाने दिले आहेत. याचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Asrology: रविवारी शिवलिंगावर गुळाचे पाणी अर्पण केल्यास काय होतात फायदे, जाणून घ्या
गेल्या काही वर्षांत यात्रेदरम्यान कित्येकवेळा वातावरण बिघडल्याचं दिसून आलं आहे. कधीकधी डीजेवर मोठ्या आवाजात संगीत तर कधीकधी रस्त्यावर गोंधळाच्या घटना समोर येत आहेत, ज्यामुळे सामान्य लोकांना त्रास होत आहे. प्रशासन आता असा घटकांवर लक्ष केंद्रित करणार आहे, जे यात्रेला शक्तीप्रदर्शनात रूपांतरित करतात. अलिकडे, काही ठिकाणी कावडीयांकडून रस्त्यांवर गोंधळ घातल्याच्या बातम्या आल्या. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आणि स्थानिक रहिवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागला. यामुळेच प्रशासनाने यावेळी तयारीत कोणतीही कसर सोडलेली नाही.
यावेळी कावड मार्गांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवली जात आहे. मार्गातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.मोठ्या आवाजात डीजे वाजवणे आणि सायलेन्सर काढून दुचाकी चालवणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांच वाहने जप्त केली जाणार आहेत. वाहन जप्ती आणि चालानची कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
Shukra Gochar: 26 जुलैपासून शुक्र ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना मिळणार यश
मेरठ झोनचे एडीजी भानू भास्कर म्हणाले की, त्रिशूळ, हॉकी स्टिक किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र वापरण्यास पूर्ण बंदी आहे. ते प्रतीकात्मकपणे बाळगण्यासही मनाई आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त बळ तैनात करण्यात आले आहे. संवेदनशील भागात रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) आणि PAC टीम सक्रिय असतील. यासोबतच स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची करडी नजर असणार आहे.