Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायल विरुद्ध हमास युद्ध! पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींवर जीवघेणा हल्ला; महमूद अब्बास थोडक्यात बचावले

  • By युवराज भगत
Updated On: Nov 08, 2023 | 03:47 PM
Fatal Attack on Palestinian President

Fatal Attack on Palestinian President

Follow Us
Follow Us:
इस्रायल आणि हमास यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे. आता याचे भीषण परिणाम दिसू लागले आहेत. गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या महिन्याभरापासून युद्ध चालू आहे. गाझा पट्टीत सर्वत्र विध्वंस सुरू आहे. अशातच वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. या जीवघेण्या हल्ल्यातून महमूद अब्बास थोडक्यात बचावले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखोरांनी अब्बास यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. परंतु, त्यांच्या ताफ्यातील संरक्षण अधिकाऱ्यांनी हल्लेखोरांवर गोळीबार करून हा हल्ला परतवून लावला. तसेच अब्बास यांचे प्राण वाचवले.

https://twitter.com/akillis21/status/1721927027421270219

हल्लेखोर आणि संरक्षण दलातील जवानांमध्ये चकमक
भर रस्त्यात हल्लेखोर आणि संरक्षण दलातील जवानांमध्ये बराच वेळ ही चकमक सुरू होती. जवानांच्या तीव्र प्रतिकारानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी संरक्षण अस्थापनांमध्ये घुसून हा हल्ला करण्यात आला होता. ‘सन्स ऑफ अबू जंदल’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
महमूद अब्बास यांना जीवे मारण्याचा कट
‘सन्स ऑफ अबू जंदल’ संघटनेने पॅलेस्टिनी राष्ट्रपती महमूद अब्बास यांना इस्रायलवर कारवाई करण्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. परंतु, अब्बास यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असे म्हणत सन्स ऑफ अबू जंदल संघटनेने महमूद अब्बास यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. परंतु, संरक्षण दलातील जवानांमुळे महबूद अब्बास थोडक्यात बचावले.
गाझा लहान मुलांसाठी स्मशान बनत आहे : संयुक्त राष्ट्र
इस्रायल आणि हमासच्या युद्धात अनेक निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. याच मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांनी काळजी व्यक्त करत मोठं विधान केलं आहे. गाझा लहान मुलांसाठी स्मशान बनत आहे, असं स्पष्ट मत अँटोनियो गुट्रेस यांनी व्यक्त केलं आहे.

Web Title: Dire consequences of israel hamas war fatal attack on palestinian president mahmood abbas narrowly escaped nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2023 | 03:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.