Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीति आयोगाच्या बैठकीवरुन विरोधकांमध्ये दुमत; इंडिया आघाडीचा बहिष्कार तर ममता बॅनर्जी जाण्यावर ठाम

दिल्लीमध्ये येत्या शनिवारी नीति आयोगाची बैठक होणार आहे. यावर विरोधकांनी इंडिया आघाडीने बहिष्कार घातला आहे. मात्र यावरुन विरोधकांमध्ये मतभेद झाले असून ममता बॅनर्जी बैठकीला जाणार आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 26, 2024 | 03:21 PM
ममता बॅनर्जी होणार नीति आयोगाच्या बैठकीमध्ये सामील

ममता बॅनर्जी होणार नीति आयोगाच्या बैठकीमध्ये सामील

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : सध्या लोकसभेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे पूर्ण बजेट सादर केले. यामध्ये आंध्रप्रदेश व बिहार या राज्यांना सरकाराने मुक्त हस्ताने निधी दिला. मात्र इतर राज्यांना निधी दिला नाही अशी नाराजी विरोधकांनी व्यक्त केली. पश्चिम बंगालसाठी खास उपाययोजना न केल्याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली. यानंतर आता विरोधीपक्षाची भूमिका बजावत असलेल्या इंडिया आघाडीने नीति आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या बैठकीला ममता बॅनर्जी हजेरी लावणार आहेत.

विरोधीपक्षामध्ये पुन्हा एकदा फूट पडलेली दिसून येत आहे. इंडिया आघाडीने नीति आयोगावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी होणार असलेल्या या बैठकीला विरोधीपक्षातील नेते उपस्थित राहणार नाहीत. त्याचबरोबर विरोधीपक्षाचे शासन असलेले राज्यांचे मुख्यमंत्र्यांनी देखील या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. यामध्ये पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मात्र या बैठकीला जाणार आहेत. त्या आपल्या निर्णयावर ठाम देखील आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासोबत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन देखील नीति आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहतील असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकत्त्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बैठकीला जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी आधीच ठरवले आहे की मी नीती आयोगाच्या बैठकीला जाणार आहे. पण त्यांची केंद्राची वृत्ती वेगळी आहे. बंगाल राज्याला देशाच्या अर्थसंकल्पापासून कसे वंचित ठेवण्यात आले आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी आम्हाला पत्र लिहायला सांगितले आहे. मात्र आम्हाला हे मान्य नाही. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात भेदभाव केला आहे. म्हणूनच मी माझा आवाज उठवण्यासाठी नीती आयोगाच्या बैठकीत जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि काही वेळ बैठकीमध्ये असणार आहे. यावेळी त्यांनी आम्हाला काही बोलण्याची संधी दिली तर आम्ही आमचे मत मांडू. झारखंडचे मुख्यमंत्री  हेमंत सोरेनही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये आम्ही आमच्या चिंता व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. केंद्र सरकारने राजकीय आणि आर्थिक नाकेबंदी केली आहे. भाजपला जनता आणि बंगालमध्ये फूट पाडायची आहे,” असा घणाघाती आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

Web Title: Disagreement among opposition over niti aayog meeting mamata banerjee insists on boycott of india alliance nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 03:21 PM

Topics:  

  • hemant soren
  • INDIA Alliance
  • Mamata Banerjee
  • Niti Aayog
  • Niti Aayog meeting

संबंधित बातम्या

NITI Aayog Internship 2025 : 12वी पास विद्यार्थ्यांना संधी! लवकर करा अर्ज
1

NITI Aayog Internship 2025 : 12वी पास विद्यार्थ्यांना संधी! लवकर करा अर्ज

Mamata Banerjee on GST Rates: जीएसटीच्या दरांवरून राजकारण; ममता बॅनर्जींंचा केंद्रावर हल्लाबोल, म्हटले, ‘श्रेय फक्त एका…..’
2

Mamata Banerjee on GST Rates: जीएसटीच्या दरांवरून राजकारण; ममता बॅनर्जींंचा केंद्रावर हल्लाबोल, म्हटले, ‘श्रेय फक्त एका…..’

Bihar Election 2025: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार; पुण्याच्या संस्थेचे ग्राऊंड रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे?
3

Bihar Election 2025: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार; पुण्याच्या संस्थेचे ग्राऊंड रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे?

कृष्ण-सुदर्शनची पौराणिक अन् जुनी मैत्री; उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीमध्ये कोण मारणार बाजी
4

कृष्ण-सुदर्शनची पौराणिक अन् जुनी मैत्री; उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीमध्ये कोण मारणार बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.