Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहमदाबाद विमान अपघात: DNA सॅम्पलिंगद्वारे मृतदेहांची ओळख; ताब्यात घेताना नातेवाईकांनी फोडला टाहो

Ahmedabad plane crash update : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. यामध्ये 275 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून DNA जुळवला जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 15, 2025 | 02:34 PM
DNA testing of dead person with relatives on Ahmedabad plane crash

DNA testing of dead person with relatives on Ahmedabad plane crash

Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघात ही मोठी दुर्दैवी घटना घडली. विमानातील प्रवासी, क्रू मेंबर्स आणि वसतिगृहातील डॉक्टर अशा सर्वांनी जीव गमावले. या विमान अपघातामधील आता मृतांची संख्या २७५ वर पोहोचली आहे. दरम्यान, रविवारी डीएनए सॅम्पलिंगद्वारे 31 मृतदेहांची ओळख पटवण्यात आली. तर २० मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबियांशी डीएनए जुळवून ओळख पटवण्यात आली आहे. यावेळी नातेवाईकांनी टाहो फोडला.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या डीएनए मॅचिंगची प्रक्रिया सुरू असल्याचे अतिरिक्त सिव्हिल अधीक्षक डॉ. रजनीश पटेल यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की आतापर्यंत ओळख पटलेले सर्व मृतदेह गुजरात आणि राजस्थानमधील वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. बहुतेक मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले होते, त्यामुळे या भयानक दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्यासाठी अधिकारी डीएनए चाचण्या घेत आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

31 DNA नमुने जुळले

आतापर्यंत ३१ डीएनए नमुने जुळले आहेत आणि २० मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत,  सरकारी बी जे मेडिकल कॉलेजमधील शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक पटेल यांनी अशी माहिती दिली आहे. तसेच, कुटुंबियांना मृत्यू प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक उदयपूर, वडोदरा, खेडा, मेहसाणा, अहमदाबाद आणि बोटाड जिल्ह्यातील होते.

पीडित कुटुंबांशी समन्वय साधण्यासाठी २३० पथके तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते. लंडनला जाणाऱ्या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते, त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणी यांचाही समावेश आहे. त्याच वेळी, एक प्रवासी चमत्कारिकरित्या वाचला.

192 रुग्णवाहिका सज्ज

गुजरात सरकारने सर्व मृतदेह त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी २३० पथके तयार केली आहेत. याशिवाय, १९२ रुग्णवाहिका आणि वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच, मृतदेह ठेवण्यासाठी १७० शवपेट्या बनवण्याचा आदेश देण्यात आला आहे. यापैकी सुमारे १०० शवपेट्या वडोदराहून अहमदाबादला आणण्यात आल्या आहेत.

केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा 

मृतदेहांचे डीएनए प्रोफाइलिंग पूर्ण

अनेक मृतदेहांचे डीएनए प्रोफाइलिंग पूर्ण झाले आहे. विमानाच्या मागील भागातून एक मृतदेह सापडला आहे. दोन जखमींवर अजूनही आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, फॉरेन्सिक तज्ञ आणि विमान वाहतूक पथके ढिगाऱ्याची तपासणी करण्यात व्यस्त आहेत. या अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बहु-विद्याशाखीय समिती स्थापन केली आहे.

Web Title: Dna testing of dead person with relatives on ahmedabad plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • Ahmedabad
  • Air India Plane Accident
  • Plane Accident

संबंधित बातम्या

Baramati Plane Accident : बारामतीत विमानाचा अपघात; उड्डाणावेळी चाकात बिघाड झाला अन्…
1

Baramati Plane Accident : बारामतीत विमानाचा अपघात; उड्डाणावेळी चाकात बिघाड झाला अन्…

Pune Airport: ‘डीजीसीए’ने जाहीर केली ‘बर्ड हिट’ची आकडेवारी; पुण्यात ११ विमानांना पक्ष्याची धडक
2

Pune Airport: ‘डीजीसीए’ने जाहीर केली ‘बर्ड हिट’ची आकडेवारी; पुण्यात ११ विमानांना पक्ष्याची धडक

India Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वे मंत्र्यानी स्पष्टच सांगितले…
3

India Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वे मंत्र्यानी स्पष्टच सांगितले…

Shocking News : बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट दहावीच्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून मारली उडी
4

Shocking News : बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट दहावीच्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून मारली उडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.