केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील यवतमाळ येथील जयस्वाल कुटुंबीयांचे निधन झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला (फोटो - सोशल मीडिया)
केदारनाथ : केदारनाथ धाम येथून अत्यंत दुखद बातमी समोर आली आहे. पुन्हा एक दुर्घटना झाली असून यामध्ये सात जणांचा अंत झाला आहे. अहमदाबाद विमान अपघाताची घटना ताजी असताना केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. दुर्घटनेत पायलटसह एकूण 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबाचा अंत झाला आहे. या अपघाताबद्दल देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे कारण समोर आले आहे. वातावरणातील होणारे बदल आणि खराब हवामान यामुळे सदर अपघात झाला आहे. आर्यन एव्हिएशन कंपनीचे असणारे हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात होते. मात्र गौरीकुंड- सोनप्रयाग परिसरात दाट धुके आणि अवकाळी पावसामुळे हेलिकॅप्टरचे नियंत्रण सुटले आणि ते जंगलात कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यानंतर अपघातानंतर जळालेले विमान गरुडचट्टीजवळ आढळले. मोठ्या प्रमाणामध्ये धूर येत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे दिसून आले. यामध्ये महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये राहणारे तीन जणांचे जयस्वाल कुटुंब उद्धवस्त झाले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
केदारनाथमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात विशेषतः यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या अपघातात पायलटसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन जण हे महाराष्ट्रातील आहे. राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल असे मृतांमधील व्यक्तींची नावे आहेत. या घटनेने वणी शहरावर शोककळा पसरली आहे. सुदैवाने या कुटुंबातील विवान नावाचा मुलगा पांढरकवडा येथील आजी-आजोबांकडे असल्याने बचावला आहे.
केदारनाथमध्ये झालेल्या या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना लिहिले आहे की, आज सकाळी केदारनाथहून गुप्तकाशीला जाताना उत्तराखंडमधील गौरीकुंडजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला, त्यामुळे खूप दुःख झाले आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील भाविकांचाही समावेश होता. मी शोकाकुल असून कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. आम्ही सर्व बाधितांच्या पाठीशी आहोत, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
Deeply pained by the tragic accident where passengers lost their lives in a helicopter crash near Gaurikund in Uttarakhand this morning while travelling from Kedarnath to Guptkashi.
Among the victims were devotees from Maharashtra as well.
I express my deepest condolences to the…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 15, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वणीतील जयस्वाल कुटुंबाबाबत संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, “केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरला गौरीकुंड येथे अपघात होऊन यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबातील तिघा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती यवतमाळच्या आपत्ती निवारण कक्षाकडून मिळाली. ही दुर्घटना दुर्दैवी आणि दुःखद असून या कुटुंबास आवश्यक ते सर्व साह्य करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेस दिल्या आहेत. जयस्वाल कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी असून शासन आपल्या पाठीशी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना विनम्र श्रद्धांजली,” अशा भावना उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केल्या.
केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरला गौरीकुंड येथे अपघात होऊन यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबातील तिघा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती यवतमाळच्या आपत्ती निवारण कक्षाकडून मिळाली. ही दुर्घटना दुर्दैवी आणि दुःखद असून या कुटुंबास आवश्यक ते सर्व साह्य करण्याच्या…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 15, 2025