Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राम मंदिरातून 20 हजार कोटींची दान चोरी, गैरव्यवहारात बड्या नेत्यांचाही समावेश’; समाजवादी पक्षाच्या नेत्याचा दावा

राम मंदिर दान चोरी प्रकरणाचा तपास आता बँकिंग यंत्रणेपर्यंत पोहोचला आहे. पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडियासह ६ बँकांना नोटीस बजावली असून, संबंधित बँक खाती, लॉकर्स आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची संपूर्ण माहिती मागवली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 02, 2026 | 08:38 AM
'राम मंदिरातून 20 हजार कोटींची दान चोरी, गैरव्यवहारात बड्या नेत्यांचाही समावेश'; समाजवादी पक्षाच्या नेत्याचा दावा

'राम मंदिरातून 20 हजार कोटींची दान चोरी, गैरव्यवहारात बड्या नेत्यांचाही समावेश'; समाजवादी पक्षाच्या नेत्याचा दावा

Follow Us
Follow Us:

अयोध्या : अयोध्या येथील राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून सरकारवर सातत्याने तिखट शब्दांत हल्ले केले जात आहेत. समाजवादी पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी मोठा आणि खळबळजनक आरोप केला आहे. ते म्हणाले की, ही देणगी चोरी म्हणजे एक अतिशय मोठा घोटाळा असून, हे संपूर्ण प्रकरण सुमारे २० हजार कोटी रुपयांचे आहे. यामध्ये अनेक बड्या लोकांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणात अनेक बड्या व्यक्ती सामील असल्यामुळेच, तपासाची सुई खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सपा नेत्याने दावा केला की, मोठ्या संख्येने भाविकांनी राम मंदिरात सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या हारांसह मोठ्या प्रमाणावर मौल्यवान वस्तू अर्पण केल्या. परंतु त्यांचा संपूर्ण हिशेब अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. उपलब्ध तथ्यांच्या आधारेच हा २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे त्यांचे म्हणणे असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

एसआयटीला १५ दिवसांची मुदतवाढ

राज्य सरकारने या दान चोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या ३ सदस्यीय एसआयटीचा कार्यकाळ आणखी १५ दिवसांसाठी वाढवला आहे. १३ जून रोजी या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती आणि सुरुवातीला त्यांना १५ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. आता पुन्हा या मुदतीत वाढ करण्यात आली.

एसबीआयसह 6 बँकांना नोटीस

राम मंदिर दान चोरी प्रकरणाचा तपास आता बँकिंग यंत्रणेपर्यंत पोहोचला आहे. पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडियासह ६ बँकांना नोटीस बजावली असून, संबंधित बँक खाती, लॉकर्स आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची संपूर्ण माहिती मागवली आहे. तपास यंत्रणा आता पैशांच्या हालचालींचा आणि ‘ट्रांजेक्शन ट्रेल’चा कसून शोध घेत आहेत. देणगीच्या रक्कमेची कुठे-कुठे विल्हेवाट लावली गेली आणि कोणत्याही स्तरावर आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न यंत्रणा करत आहेत.

महंत नृत्य गोपाल दास रुग्णालयात

राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास महाराज यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी लखनौ येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यातही त्यांची प्रकृती बिघडली होती, तेव्हाही त्यांच्यावर लखनऊच्या मेदांतातच उपचार करण्यात आले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून महंतांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

Ram Mandir Scam : २ जागांवरून सत्तेचे शिखर गाठलेल्या भाजपची ‘अग्निपरीक्षा’; राम मंदिर निधी वादाने राजकारण तापले

Web Title: Donations worth 20000 crores stolen from ram mandir top leaders also involved in the irregularities says ramgopal yadav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Ayodhya ram mandir
  • Ram Temple in Ayodhya

संबंधित बातम्या

राम मंदिरातील दानचोरी प्रकरणातील ‘ते’ रहस्य अखेर उलगडले; SBI कर्मचाऱ्याने…
1

राम मंदिरातील दानचोरी प्रकरणातील ‘ते’ रहस्य अखेर उलगडले; SBI कर्मचाऱ्याने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.