Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahmedabad Plane Crash: क्षणभरासाठी काळजाचा ठोका चुकला…; डॉ. सुशांत देशमुखांनी सांगितला प्लेन क्रॅशचा थरारक अनुभव

अहमदाबादमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर (AI-171) विमान दुर्घटनेत एकूण २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 14, 2025 | 11:12 AM
अहमदाबाद अपघातापूर्वी कॉकपिटमध्ये नक्की काय घडलं होतं? ब्लॅक बॉक्समधून धक्कादायक माहिती समोर

अहमदाबाद अपघातापूर्वी कॉकपिटमध्ये नक्की काय घडलं होतं? ब्लॅक बॉक्समधून धक्कादायक माहिती समोर

Follow Us
Close
Follow Us:

Ahmedabad plane crash:  एअर इंडियाच्या AI-171 (बोईंग 787 ड्रीमलायनर) विमानाच्या अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. सर्वत्र आग, धूर, तणाव आणि आरडाओरडाचे वातावरण होते. “सुरुवातीला काय झाले तेच समजले नाही. क्षणभरासाठी काळजाचा ठोका चुकला,” असे अनुभव शहरातील तरुण डॉक्टर डॉ. सुशांत देशमुख यांनी व्यक्त केला.

या भीषण दुर्घटनेने अनेकांचा जीव गेला असून, हा प्रसंग डॉ. देशमुख यांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला आहे. “ही घटना खूप दुःखद होती. अशा संकटात स्वतःला सावरत इतरांना मदत करणे, हेच खरे माणूसपण,” असेही त्यांनी नमूद केले.एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोईंग ७८७ ड्रीमलायनर) विमानाच्या अहमदाबादमधील भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. वसतिगृहाभोवती धुराचे ढग पसरले होते. या भीषण घटनेचा थरारनुभव नागपूरचे तरुण डॉक्टर डॉ. सुशांत देशमुख यांनी शेअर केला.

Nagupur Politics: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का;  शेकडो कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

डॉ. देशमुख सध्या बी. जे. मेडिकल कॉलेज कॅम्पसशी संलग्न असलेल्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट (GCRI) च्या सुपरस्पेशालिटी विभागात ऑन्कोलॉजी सर्जरीमध्ये पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षात आहेत. शुक्रवारी संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “घटनेच्या वेळी मी ट्रॉमा ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी करत होतो. ओपीडी संपल्यानंतर हॉस्टेलकडे निघालो असतो, तोच माझ्या वर्गमित्रांनी सांगितलं की हॉस्टेलला आग लागली आहे. मी तातडीने बाहेर आलो. काही आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी आत गेलो आणि पुन्हा बाहेर आलो, तेव्हा आजूबाजूला सर्वत्र धूर पसरलेला होता. वातावरणात एकच गोंधळ, घाबरलेली माणसं आणि धावपळ होती.”

या अपघातात अनेक निष्पाप जिवांचा बळी गेला. डॉ. सुशांत यांनी संकटाच्या वेळी भान ठेवत इतरांची मदत करण्याचे कामही केले. “ही घटना कायमची आठवणीत राहील. अशा वेळेस डॉक्टर म्हणून आपली जबाबदारी अधिकच वाढते,” असे त्यांनी नमूद केले.

Father’s Day 2025: आपल्या बाबांना गिफ्ट करा हे जबरदस्त कॅमेरा स्मार्टफोन्स, किंमत 25,000 हून कमी

नेमकं काय झालं १२ जूनला?

अहमदाबादमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलायनर (AI-171) विमान दुर्घटनेत एकूण २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये २४१ प्रवासी विमानात होते, तर अपघातग्रस्त परिसरातील २४ नागरिकांचाही बळी गेला असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे.

टेकऑफनंतर केवळ ५० सेकंदांत कोसळले विमान

प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, विमानाने धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या १२–१५ सेकंदांत नियंत्रण सुटले आणि टेकऑफनंतर ५० सेकंदांतच विमान कोसळले. या अपघातामुळे परिसरात प्रचंड आगीचे लोळ उठले आणि अनेक वसतिगृहे व हॉस्पिटल्स धुराच्या वेढ्यात अडकली.

‘मे-डे कॉल’ देऊनही मदत मिळाली नाही

वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल यांनी नियंत्रण केंद्राला ‘मे-डे कॉल’ देऊन तातडीचा संदेश पाठवला होता. परंतु, मदत पोहोचण्यापूर्वीच विमान कोसळल्याने कोणतीही कृती करता आली नाही. ही दुर्घटना भारताच्या नागरी विमान वाहतूक इतिहासातील सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक ठरली आहे.

 

Web Title: Dr salil deshmukh recounts the thrilling experience after the ahmedabad plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • Ahmedabad plane crash
  • Air India Plane Accident

संबंधित बातम्या

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाने पाठवली नोटीस
1

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाने पाठवली नोटीस

Ahmedabad Plane Crash: अरे भावनांशी खेळू नका! विमान दुर्घटनेच्या चौकशीत खरे कारण लपवले? SC मध्ये याचिका दाखल
2

Ahmedabad Plane Crash: अरे भावनांशी खेळू नका! विमान दुर्घटनेच्या चौकशीत खरे कारण लपवले? SC मध्ये याचिका दाखल

अहमदाबाद विमान अपघातग्रस्तांना मिळणार न्याय? अखेर Boeing विरोधात अमेरिकेत खटला दाखल
3

अहमदाबाद विमान अपघातग्रस्तांना मिळणार न्याय? अखेर Boeing विरोधात अमेरिकेत खटला दाखल

अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाचे ११२ पायलट का गेले होते रजेवर? समोर आलं मोठं कारण
4

अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाचे ११२ पायलट का गेले होते रजेवर? समोर आलं मोठं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.