
सिंधुदुर्ग : दुबईहून-बंगळुरुच्या (Dubai) दिशेने जाणारे पार्थ हे तेलवाहतूक करणारे जहाज विजयदुर्ग (Vijaydurg) किनाऱ्यानजीक बुडाले. सुदैवाने या जहाजावरील (Parth Ship) सर्व कर्मचाऱ्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे.
रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या (Ratnagiri Coast Guard) कर्मचाऱ्यांनी वेळीच मदतकार्य सुरू केल्यामुळे जहाजावरील १९ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे. जहाजाच्या तळाला मोठे भोक पडल्याने विजयदुर्ग किनार्यापासून चाळीस वावमध्ये तेल वाहतूक (Oil Transportation) करणारे दुबई येथील पार्थ हे जहाज बुडाले. हे जहाज दुबईतून बंगळूरच्या दिशेने जात होते.
जहाज बुडत असल्याचे लक्षात येताच जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तटरक्षक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर रत्नागिरीतील तटरक्षक दलाने या जहाजावरील १९ कर्मचाऱ्यांना वाचविले आहे.