Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anil Ambani: उद्योगपती अंबानींच्या अडचणीत वाढ! ED कडून ‘लुकआऊट’ नोटीस; चौकशीसाठी धाडले समन्स

ED Summons: ईडीने काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी केल्याचे समोर आले होते. त्यानंतर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 02, 2025 | 06:41 AM
Anil Ambani: उद्योगपती अंबानींच्या अडचणीत वाढ! ED कडून ‘लुकआऊट’ नोटीस; चौकशीसाठी धाडले समन्स
Follow Us
Close
Follow Us:

१. अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ
२. ईडीकडून लुकआऊट नोटीस जारी
३. काही दिवसांपूर्वी ईडीकडून अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केल्याचे समोर आले होते.

Money Laundering Case: देशातील उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण ईडीने त्यांच्याविरुद्ध ‘लुकआऊट’ नोटीस जारी केली आहे. ३ हजार कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना चौकशीचे समन्स धाडले आहे. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी अनिल अंबानी यांची ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याने अनिल अंबानी आता कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाच्या बाहेर जाता येणार नाही.

ईडीने काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी (Anil Ambani )यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी केल्याचे समोर आले होते. त्यानंतर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली असून, चौकशीसाठी समन्स देखील धाडले आहे. हे प्रकरण ३ हजार कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित असल्याचे समजते आहे.

नेमके प्रकरण काय?

अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपनीच्या एका योजनेअंतर्गत सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. बँकेकडून मिळालेले तीन हजार कोटींचे कर्ज चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आले असे त्यांच्यावर आरोप आहे. कर्ज मिळण्याच्या आधी बँकेच्या प्रमोटर्सशी संबंधित कंपन्यांना पैसे दिले गेले असा संशय ईडीला आहे. त्यामुळे ईडीकडून आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

बँकेने कर्जाची रक्कम अनिल अंबानी यांच्या कंपन्यांना देताना नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यामुळे या कर्ज प्रकरणाची चौकशी आता ईडीकडून केली जात आहे. यासाठी अनिल अंबानी यांची ५ ऑगस्ट रोही चौकशी होण्याची शक्यता आहे.

ईडीने केली होती छापेमारी

काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांवर छापेमारी केल्याचे समोर आले होते. तपास यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि संगणक उपकरणे जप्त केली. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, ईडीने २४ जुलै रोजी ३००० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई छापेमारी केल्याचे समोर आले होते.

Fraud Loan Case: सलग तिसऱ्या दिवशी ED ची कारवाई, Anil Ambani च्या कंपन्यांवर छापा; कागदपत्रं-डिव्हाईस जप्त

निधीचा गैरवापर असल्याचा आरोप 

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित सुमारे १०,००० कोटी रुपयांच्या कर्ज निधीचा गैरवापर केल्याचा खटला देखील एजन्सीच्या चौकशीत आहे. ‘रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड’ (RHFL) बाबतचा SEBI चा अहवाल देखील ED च्या चौकशीचा आधार बनला असे मानले जाते.

Web Title: Ed lookout notice and sent enquiry summons against industrialist anil ambani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 06:21 AM

Topics:  

  • anil ambani
  • Enforcement Directorate

संबंधित बातम्या

अनिल अंबानीच्या ‘या’ कंपनीमध्ये 5% तेजी, सरकारी कंपनी ज्यांना मिळाले प्रोजेक्ट
1

अनिल अंबानीच्या ‘या’ कंपनीमध्ये 5% तेजी, सरकारी कंपनी ज्यांना मिळाले प्रोजेक्ट

Suresh Raina: बेटिंग App प्रकरणात सुरेश रैनावर कोणते आरोप? ED च्या फेऱ्यात अडकला, चौकशीसाठी बोलावले
2

Suresh Raina: बेटिंग App प्रकरणात सुरेश रैनावर कोणते आरोप? ED च्या फेऱ्यात अडकला, चौकशीसाठी बोलावले

कायद्याच्या चौकटीमध्येच करा काम…! ED च्या तपास यंत्रणेवर सुप्रीम कोर्ट नाराज
3

कायद्याच्या चौकटीमध्येच करा काम…! ED च्या तपास यंत्रणेवर सुप्रीम कोर्ट नाराज

संकटकाळात Anil Ambani ला दिलासा! 11 वर्ष जुन्या वादात विजय; खात्यात जमा होणार रू 28481 कोटी, शेअर्स चढणार
4

संकटकाळात Anil Ambani ला दिलासा! 11 वर्ष जुन्या वादात विजय; खात्यात जमा होणार रू 28481 कोटी, शेअर्स चढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.