Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ED on AAP Sanjeev Arora : EDच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपची चाल? AAP मंत्री संजीव अरोरा यांच्या घरावर छापा

ED On AAP : एकाच आठवड्यामध्ये आम आमदी पक्षाच्या दोन नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. अशोक मित्तल यांच्यानंतर पंजाबमधील मंत्री संजीव अरोरा यांच्या घरावर धाड टाकण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 17, 2026 | 11:01 AM
ED raid action on AAP leader Sanjeev Arora Punjab government minister political news

ED raid action on AAP leader Sanjeev Arora Punjab government minister political news

Follow Us
Close
Follow Us:
  • पंजाब सरकारमधील मंत्री संजीव अरोरांवर ईडी कारवाई
  • संजीव अरोरा यांच्या घरावर आणि व्यवसायावर छापा
  • एकाच आठवड्यात आपच्या दोन नेत्यांवर निशाणा
ED on AAP Sanjeev Arora : पंजाब : पंजाबच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या निशाण्यावर आता पंजाब राज्य आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार असून नेत्यांच्या घरावर धाड सत्र सुरु झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नवनियुक्त AAP राज्यसभा उपनेते अशोक मित्तल यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली तर आज पंजाब सरकारमधील मंत्री संजीव अरोरा यांच्या घरावर ईडीने कारवाई केली आहे. ही राजकीय खेळी (Political News) असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून केला जात आहे.

ईडीने एकाच आठवड्यात आम आदमी पक्षाच्या दोन बड्या नेत्याच्या घरी छापा टाकला आहे. पंजाबमधील मंत्री संजीव अरोरा हे आता ईडीच्या रडारवर आले आहेत. सौरभ भारद्वाज यांनी अरोरा यांच्या घरावर झालेल्या छाप्याबद्दलही माहिती दिली. त्यांनी यात भाजपच्या सहभागाकडेही बोट दाखवत म्हटले की, त्यांची निवडणुकीची तयारी अशाच प्रकारे केली जाते आणि ती आधीच सुरू झाली आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार आणि लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे (एलपीयू) कुलपती अशोक मित्तल यांच्या १० ठिकाणांवर ईडीने छापे टाकल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी ही कारवाई झाली आहे.

हे देखील वाचा : राघव चड्ढांचा BJP ने घेतला बदला? नवनियुक्त AAP राज्यसभा उपनेते अशोक मित्तल ED च्या रडारवर

आज सकाळी, ईडीचे एक पथक संजीव अरोरा यांच्या लुधियानामधील घरी पोहोचले आणि त्यांनी छापा टाकला. निवासस्थानाबाहेर केंद्रीय पोलीस दल तैनात करण्यात आले होते. निवासस्थानाव्यतिरिक्त इतर ठिकाणीही छापे टाकण्यात आले. ईडीच्या पथकाने घर पूर्णपणे सील केले असून, कोणालाही आत किंवा बाहेर जाण्याची परवानगी नाही. ही कारवाई एका जुन्या मनी लाँड्रिंग प्रकरणातून आणि जमिनीच्या व्यवहारांमधील कथित अनियमिततेतून करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : मोठा अपघात टळला! दिल्ली विमानतळावर दोन विमानांची टक्कर, सर्व प्रवासी सुरक्षित

लुधियाना पश्चिम पोटनिवडणूक लढवण्यासाठी राज्यसभा सोडली

संजीव अरोरा हे लुधियानामधील एक सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांची ‘रितेश इंडस्ट्रीज’ नावाची निर्यात कंपनी आहे, जी प्रामुख्याने अमेरिकेत कार्यरत आहे. २०१८ मध्ये, संजीव अरोरा यांनी ‘फेमेला फॅशन लिमिटेड’ची स्थापना करून फॅशन विश्वात प्रवेश केला. २०२२ मध्ये आम आदमी पक्षाने त्यांना पंजाबमधून राज्यसभेवर उमेदवारी दिल्यावर त्यांनी पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. ते १० एप्रिल २०२० रोजी खासदार झाले. त्यानंतर पक्षाने त्यांना फेब्रुवारी २०२५ मध्ये लुधियाना पश्चिम जागेसाठी उमेदवारी दिली, जिथे अरोरा यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा १०,६३७ मतांच्या फरकाने पराभव केला. अरोरा हे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या जवळचे मानले जातात.

Web Title: Ed raid action on aap leader sanjeev arora punjab government minister political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 11:01 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.