Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले; ते घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवायचे; अजित पवार गटाचा मोठा दावा

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीची लढाई निवडणूक आयोगात पोहचल्यानंतर आता अजित पवार गटाने आपल्याकडेच आमदारांची संख्या सर्वाधिक असल्याचा दावा करीत. शरद पवार आपल्या मर्जीनेच पक्ष चालवित असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर आपले घर चालवल्याप्रमाणे ते पक्ष चालवित होते, असा घणाघाती आरोपदेखील त्यांनी केला.

  • By युवराज भगत
Updated On: Oct 09, 2023 | 09:43 PM
Sharad Pawar-Ajit Pawar

Sharad Pawar-Ajit Pawar

Follow Us
Close
Follow Us:

Sharad Pawar Vs Ajit Pawar : पक्षाच्या अंतर्गत कामात लोकशाहीचा अभाव असल्याचे सांगत एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही, राष्ट्रवादीमध्ये (NCP) हेच सुरू होते, असा आरोप अजित पवार (Ajit Pawar) गटाने केला. शरद पवार हे (Sharad Pawar) घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते. पक्षात लोकशाहीचा अभाव होता असा मोठा दावा अजित पवार गटाने केला आहे. तसेच आमदारांची संख्या आपल्याकडे मोठी आहे, त्यामुळे पक्ष आमचाच आहे असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावर आज पुन्हा सुनावणी सुरू असून अजित पवार गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येत आहे.

शरद पवार यांच्याकडून सिंघवी करणार युक्तीवाद

अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल (Neeraj Kishan Kaul) आणि मनिंदर सिंह (Maninder Singh) हे युक्तिवाद करत आहेत. तर शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Singhvi) हे युक्तिवाद करणार आहेत.

अजित पवार गटाकडून सादिक अली केसचा दाखला

आमदारांची संख्या आमच्याकडेच, अजित पवार गटाचा सादिक अली केसचा दाखला
राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे आमच्यासोबत असून त्यांच्या सहीनेच नवीन नियुक्त्या करण्यात आल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा आमदारांच्या संख्येचा दाखला देण्यात आला आहे. पक्ष आणि चिन्ह कुणाचं याचा निर्णय कार्यकर्ते घेतील असं अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला सांगितलं. अजित पवार गटाने सादिक अली केसचा दाखला दिला. सादिक अली केसमध्ये आमदारांची संख्येला महत्व देण्यात आलं होतं. तसेच अजित पवार गटाकडून शिवसेनेच्या केसचाही दाखला देण्यात येत आहे.

अजित पवार गटाकडून युक्तिवाद

महाराष्ट्र विधानसभेचे 53 पैकी 42, विधानपरिषदेचे 9 पैकी 6 आणि नागालँडमध्ये 7 पैकी 7 असे 55 आमच्या पाठिशी, तर लोकसभेत 5 पैकी 1 आणि राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आमच्यासोबत आहेत आहेत असा दावा गेल्या सुनावणीच्या वेळी अजित पवार गटाकडून करण्यात आला होता. अजित पवार गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर नंतर शरद पवार गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे.

Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP Crisis Live Update : सुनावणीचे लाईव्ह अपडेट्स
आमच्याकडे दीड लाखाहून अधिक शपथपक्ष आहेत.
नियमानुसार नियुक्त्या केल्या जात नव्हत्या. शरद पवार आपले घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत आहेत.
अजित पवार गटाकडून सादिक अली केसचा दाखला दिला. सादिक अली केसमध्ये आमदारांच्या संख्येला महत्व देण्यात आले होते.
अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी राष्ट्रवादीची घटना वाचून दाखवली.
जे स्वतः निवडून आले नाहीत ते इतरांच्या नेमणुका कशा करू शकतात. अजित पवार गटाचा शरद पवारांवर थेट आक्षेप.
पदाधिकाऱ्यांच्या फक्त नियुक्त्या व्हायच्या, निवडणूक व्हायच्या नाहीत.
आमच्याकडे एक लाखाहून शपथपत्रं आहेत, शरद पवारांकडे 40 हजार शपथपत्रं आहेत असं अजित पवार गटाने सांगितलं.
शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले.
ज्यांची निवड पवारांनी केली तेच पवारांची निवड कशी करू शकतात?
पक्षात फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता- अजित पवार गट
राष्ट्रवादी चिन्ह आम्हालाच मिळावं.
अजित पवार गटाकडे किती आमदार आहेत हे जाहीर करावं, शरद पवार गटाची मागणी.

Web Title: Election commission hearing on ncp big claim of ajit pawar group they said sharad pawar broke all rules he survive the party like he survive the house nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2023 | 06:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.