Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court News: ‘तारीख पे तारीख’ बंद: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; सुनावणी पुढे ढकलण्याच्या नियमांत मोठे बदल

वारंवार सुनावणी पुढे ढकलल्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा डोंगर वाढत चालला होता. पण न्यायालयच्या या नव्या ऐतिहासिक निर्णयामुळे न्यायालयीन कामकाजात वेग येणार असून सर्वसामान्यांना वेळेत न्याय मिळण्याची शक्यता वाढली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 19, 2026 | 04:56 PM
Supreme Court, Justice Delayed is Justice Denied, Supreme Court Legal Reforms 2026, Pending Cases India, Indian Judiciary New Rules.

Supreme Court, Justice Delayed is Justice Denied, Supreme Court Legal Reforms 2026, Pending Cases India, Indian Judiciary New Rules.

Follow Us
Follow Us:
  • सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी पुढे ढकलण्याच्या (Adjournment) नियमांत ऐतिहासिक बदल
  •  वारंवार सुनावणी पुढे ढकलण्याच्या प्रथेमुळे न्यायव्यवस्थेचे आणि सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
  • या प्रथेमुळे भारतीय न्यायालयांमध्ये कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत
Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयांमध्ये वारंवार सुनावणी पुढे ढकलण्याच्या (Adjournment) प्रथेमुळे अनेक महत्त्वाचे खटले वर्षानुवर्षे तसेच चालत राहतात. वर्षानुवर्षे निकाल न लागल्यामुळे पक्षकार मानसिक तणावाखाली जगतात. “न्यायाला होणारा उशीर हा न्याय नाकारण्यासारखाच आहे” (Justice delayed is justice denied) या उक्तीनुसार, व्यक्तीच्या आयुष्यातील उमेदीचा काळ केवळ कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात जातो. पण सर्वोच्च न्यायालयाने आता या तारीख पे तारीख या प्रथेला अंकुश ठवण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या १८ मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या नवीन परिपत्रकानुसार, सुनावणी पुढे ढकलण्याचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत, क महत्त्वाची बाब म्हणजे आता तारीख पे तारीख चा प्रथा आता पूर्णपणे कालबाह्य होणार असून आता केवळ’अत्यंत तातडीच्या’ परिस्थितीतच सुनावणीची तारीख पुढे ढकलण्याची विनंती मान्य केली जाणार आहे.

Haryana Heart Attack Data 2026 : कोविडनंतर हरियाणात हजारो तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू, आकडा वाचून बसेल धक्का

न्यायालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, हे नवीन नियम २९ नोव्हेंबर २०२५ आणि २ डिसेंबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णय रद्द करण्यात आले असून त्याजागी या नव्या नियमांचे पालन केले जाईल. याअंतर्गत वेगवेगळ्या प्रकरणांच्या स्वरूपाप्रमाणे स्वतंत्र आणि कठोर नियमावली निश्चित करण्यात आली आहे. वारंवार सुनावणी पुढे ढकलल्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा डोंगर वाढत चालला होता. पण न्यायालयच्या या नव्या ऐतिहासिक निर्णयामुळे न्यायालयीन कामकाजात वेग येणार असून सर्वसामान्यांना वेळेत न्याय मिळण्याची शक्यता वाढली आहे. न्यायालयीन प्रक्रियेला गती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलण्याच्या (Adjournment) नियमांत ऐतिहासिक बदल केले आहेत. १८ मार्च रोजी जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार, ‘नियमित प्रकरणांमध्ये’ आता कोणतीही सबब स्वीकारली जाणार नाही. एकदा प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध झाले की, त्यावर विनाविलंब सुनावणी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

काय आहेत नवीन कठोर नियम?

आगाऊ सूचना अनिवार्य: जर एखाद्या पक्षाला सुनावणी पुढे ढकलायची असेल, तर दुसऱ्या पक्षाला सुनावणीच्या आदल्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत कळवणे आणि त्याचा पुरावा देणे आवश्यक आहे.

आक्षेपाची संधी: दुसऱ्या पक्षाला दुपारी १२ वाजेपर्यंत ईमेलद्वारे आपला आक्षेप नोंदवता येईल, जो थेट न्यायालयासमोर मांडला जाईल.

मर्यादित संधी: नवीन प्रकरणांमध्ये सुनावणी पुढे ढकलण्याचा अर्ज फक्त एकदाच करता येईल. तसेच, कोणत्याही परिस्थितीत सलग दोनदा सुनावणी तहकूब करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Matthew Van Dyke: रक्तरंजित मोहिमांचा सूत्रधार भारताच्या ईशान्येला बनवणार होता ‘युक्रेन’; NIA च्या एका धाडीत चिरडला गेला डाव

केवळ ‘हीच’ कारणे ग्राह्य: कुटुंबातील सदस्याचा मृत्यू, गंभीर आजार किंवा न्यायालयाला पटणारे अत्यंत ठोस कारण असल्याशिवाय तारीख दिली जाणार नाही.

विशेष म्हणजे, सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्याला यापूर्वी किती वेळा मुदतवाढ घेतली आहे, याची संख्याही अर्जात नमूद करावी लागणार आहे. प्रलंबित खटल्यांचा डोंगर कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

सर्वोच्च न्यायालय निर्णय, तारीख पे तारीख, सुप्रीम कोर्ट नवीन परिपत्रक १८ मार्च, प्रलंबित खटले, न्याय मिळण्यास विलंब, न्यायालयीन सुधारणा २०२६.

 

 

Web Title: End of tarikh pe tarikh supreme court imposes strict rules on case adjournments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Law And Order
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द
1

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम
2

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
3

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद
4

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.