Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : कॉँग्रेस नेते राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? थेट गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

राहुल गांधी वेळीच सावध व्हा. नाहीतर येणाऱ्या काळात तुमची देखील तुमच्या आजीसारखीच गत होईल, अशा इशारा भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी दिला. हा व्हिडीओ काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर केला आहे . तसेच काँग्रेसने मोदींना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 21, 2024 | 07:58 PM
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? वादग्रस्त वक्तव्याविरोधात वाराणसीत गुन्हा दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? वादग्रस्त वक्तव्याविरोधात वाराणसीत गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:

वाराणसी: विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे काही दिवसांपूर्वी अमेरिका दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका मुलाखतीमध्ये शीख समुदायाबद्दल एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे शीख समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे. दरम्यान यावरून आता राजकारण तापले आहे. काँग्रेसने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. भाजपकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तसेच आता या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण राहुल गांधी यांच्याविरोधात वाराणसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमेरिकेतील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या शीख समाजावरील विधानामुळे हा वाद निर्माण झाला आहे. एखाद्या शीख व्यक्तीने भारतात पगडी किंवा हातात कडे घालावे की नाही, एखादी शीख व्यक्ती गुरुद्वारामध्ये जाऊ शकते की नाही. यासाठी ही लढाई असून, केवळ याच नाही तर सर्व धर्मांसाठी आहे, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. यावर भाजप व शीख समाजाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघात राहुल गांधीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात कलम १५२ अन्वये वाराणसीमधील सिग्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात राहुल गांधींची वादग्रस्त वक्तव्ये देशाच्या एकात्मतेला आणि अखंडतेला धोका असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष एमएलसी हंसराज विश्वकर्मा आणि महानगर अध्यक्ष विद्यासागर राय यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते गेल्या शुक्रवारी सिग्रापोलिस ठाण्यात पोहोचले. दरम्यान, भाजपचे महानगर उपाध्यक्ष अशोक कुमार, रहिवासी रंगिया महल, आंध्रपुल यांनी सिग्रा पोलिस स्टेशन प्रभारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

तुमची देखील आजीसारखीच गत करू…

दिल्लीचे माजी आमदार आणि भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोरील निदर्शनामध्ये एक वक्तव्य केले. त्यात ते म्हणाले, ”राहुल गांधी वेळीच सावध व्हा. नाहीतर येणाऱ्या काळात तुमची देखील तुमच्या आजीसारखीच गत होईल.” अशा इशारा तरविंदर सिंग मारवाह यांनी दिला. हा व्हिडीओ काँग्रेसने सोशल मीडियावर शेअर केला आहे . तसेच काँग्रेसने मोदींना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे. तसेच हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. तुमच्या पक्षाच्या द्वेषाच्या फॅक्टरीचं हे प्रॉडक्ट आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. यावर कारवाई करावीच लागेल, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Web Title: Fir file against in varanasi against rahul gandhi sikh community controversial statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 07:58 PM

Topics:  

  • Rahul Gandhi
  • varanasi

संबंधित बातम्या

Madhya Pradesh: सामायिक वारशातून प्रगतीची दिशा; मध्य प्रदेशात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी – मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव
1

Madhya Pradesh: सामायिक वारशातून प्रगतीची दिशा; मध्य प्रदेशात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी – मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.