Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…येणाऱ्या काळात संघर्ष पुन्हा सुरू होऊ शकतो”; परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला अखेरचा इशारा

भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाकिस्तनला उघडे पाडले आहे. आता युरोपमधून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकला सज्जड इशारा दिला आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 10, 2025 | 08:02 PM
"...येणाऱ्या काळात पुन्हा सुरू संघर्ष होऊ शकतो"; परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला अखेरचा इशारा

"...येणाऱ्या काळात पुन्हा सुरू संघर्ष होऊ शकतो"; परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला अखेरचा इशारा

Follow Us
Follow Us:

India Vs Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या आहेत. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. तसेच ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाकिस्तनला उघडे पाडले आहे. आता युरोपमधून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकला सज्जड इशारा दिला आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. एस. जयशंकर हे बेल्जियमच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. पाकिस्तानने पुन्हा भारताविरुद्ध दहशतवादी कारवाई करण्याचा प्रयत्न केला किंवा आम्हाला दहशतवाद्यांच्या मदतीने चिथवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करू, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले आहेत.

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना उघडपणे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानंतर त्यांना भारतात कारवाई करण्यासाठी पाठवले जात आहे. जर त्यांनी ही कृत्ये थांबवली नाहीतर, भारताकडून मिळणारया उत्तराचा सामना करावा लागेल. मग आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारू. दहशतवादी कारवाया सुरूच राहिल्या तर येणाऱ्या काळात संघर्ष पुन्हा सुरू होऊ शकतो, असे एस. जयशंकर म्हणाले आहेत.

Operation Sindoor logo : अवघ्या ४५ मिनिटांत बनवला ऑपरेशन सिंदूरचा लोगो, ‘या’ दोन अधिकाऱ्यांची नावे समोर

ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानची मोठी कबुली

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने या भ्याड हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे आधीच स्पष्ट केलं होतं. 7 मे मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठीकाणांवर हल्ला केला. या ऑपरेशन अंतर्गत एकूण 9 दहशतवादी ठीकाणांवर हल्ला केला गेला.

ही कारवाई योग्य रणनितीनुसार पार पडली. या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्य तळ नव्हतं, पण दहशतवादी ठीकाणांवर वेचून हल्ला केला आहे. भारताने दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केली आहे. मात्र आता पाकिस्तानच्या कागदपत्रात ऑपरेशन सिंदूरबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारतीय सैन्याने सांगितलेल्यापेक्षा पाकिस्तानचे जास्त नुकसान झाले आहे असा दावा पाकिस्तानमधून करण्यात येत आहे.

Operation Sindoor : ‘भारताने २० नव्हे तर २८ क्षेत्रे उद्ध्वस्त केली’, ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानची मोठी कबुली

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने फक्त दहशतवादी अड्डे लक्ष्य केले होते. परंतु त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने आघाडी उघडली. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय सैन्याने तो हाणून पाडला. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या लष्करी तळांना मोठे नुकसान झाले.

ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानने अनेक वेळा खोटे बोलले आहे. परंतु त्यांच्या कागदपत्रांनी हे खोटे उघड केले आहे. पाकिस्तानच्या कागदपत्रांमध्ये असे दिसून आले आहे की भारताने आत खोलवर प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी पाकिस्तानमध्ये २० नव्हे तर २८ ठिकाणी हल्ले केले होते.

Web Title: Foreign minister s jaishankar warn to pakistan about terror attack pahalgam operation sindoor news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 07:55 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • S. Jaishankar

संबंधित बातम्या

Ajit Doval and S Jaishankar: BRICS परिषदेपासून जागतिक मंचांपर्यंत; देशाचे ‘हे’ दोन शिलेदार नेमकं किती शिकलेत?
1

Ajit Doval and S Jaishankar: BRICS परिषदेपासून जागतिक मंचांपर्यंत; देशाचे ‘हे’ दोन शिलेदार नेमकं किती शिकलेत?

India-Canada Ties : जयशंकर यांनी शेअर केला अनिता आनंद यांच्या भेटीचा व्हिडिओ; 2030 पर्यंत 70 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य
2

India-Canada Ties : जयशंकर यांनी शेअर केला अनिता आनंद यांच्या भेटीचा व्हिडिओ; 2030 पर्यंत 70 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
3

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.