मोठी बातमी! माजी पंतप्रधान देवेगौडांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात दोषी
जनता दलाचे (एस) माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना बलात्कार आणि लैंगिक छळाच्या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने रेवण्णा यांना या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने निकाल देताच रेवण्णा यांना अश्रू अनावर झाले. सेक्स टेप प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यावर आज सुनावणी पार पडली.
Raigad Crime : समुद्रकिनारी सापडली चरस असलेली गोणी; 55 लाखांचा माल जप्त
प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक छळाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यासोबतच त्यांच्यावर अनेक महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्यावरील आरोपांमुळे जेडीएसने त्यांना पक्षातून निलंबितही केले आहे. प्रज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू असून त्यांच्यावर एकूण ४ गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी त्यांना फक्त एकाच प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत त्या प्रकरणांमध्ये न्यायालय निकाल देऊ शकते.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
प्रज्वल रेवण्णा यांच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने त्यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. याशिवाय, बेंगळुरूमध्ये सार्वजनिक ठिकाणी अनेक पेन ड्राइव्ह सापडले होते. पेन ड्राइव्हमध्ये ३ हजार ते ५ हजार व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला होता, ज्यामध्ये ते महिलांचा लैंगिक छळ करताना दिसत आहे. व्हिडिओंमध्ये महिलांचे चेहरेही स्पष्ट दिसत होते.
हे प्रकरण उघडकीस आल्यापासून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. चौकशीनंतर प्रज्वलवर बलात्कार, छेडछाड, ब्लॅकमेलिंग आणि धमकी देण्याचे आरोप असलेले ३ गुन्हे दाखल करण्यात आले. महिलांवर बलात्कार केल्यानंतर ते सरकारी नोकरीची ऑफर देत होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
50 लाख रुपये दे, नाहीतर…; व्यावसायिकाला धमकी देत मागितली खंडणी; पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले
प्रज्वल रेवन्ना हा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. तर माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे नातू आहेत. तर वडील मंत्री राहिले आहेत सुमारे १० वर्षे जेडीएसचे राजकारण करत होते. रेवन्ना यांनी २०१९ मध्ये हसनमधून लोकसभा निवडणूकही जिंकली. तथापि, २०२४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं.
लोकसभा निवडणुकीदरम्यान हे प्रकरण समोर आलं. प्रज्वल रेवण्णाच्या सेक्स टेपचे प्रकरण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान समोर आलं होते. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. यानंतर कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी चौकशीची मागणी केली आणि काँग्रेस सरकारला पत्र लिहिले, त्यानंतर सरकारने चौकशीचे आदेश देण्यात आले होते.