Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan War : तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात? तर थांबा, ‘हे’ जरूर वाचा…

जागतिक बाजारातही सोन्याचे भाव घसरल्याचे पाहिला मिळाले. अमेरिकेतील सोन्याचे फ्युचर्स 1.2 टक्क्यांनी कमी होऊन प्रति औंस 3350 डॉलरवर आले. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये व्यापार करार झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 09, 2025 | 12:06 PM
भारत-पाक तणाव अन् अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय, सोन्याच्या दरांवर होणार परिणाम

भारत-पाक तणाव अन् अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय, सोन्याच्या दरांवर होणार परिणाम

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. त्यानंतर दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. यातच आता भारत-पाक तणावाचा विमानसेवेलाही मोठा फटका बसला आहे. त्यात भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव आणखीन वाढला आहे. याचा आता सोन्याच्या दरांवर परिणाम होताना दिसत आहे.

सोने-चांदीचे दर जीएसटीसह एक लाख रुपयांहून अधिक झाले होते. मात्र, भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका महत्त्वाच्या घोषणेमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. गुरुवारी (दि.8) संध्याकाळी सोन्याच्या दरात लक्षणीय घट नोंदवली गेली. ट्रम्प यांनी लवकरच ब्रिटनसोबत मोठा व्यापार करार करण्याची शक्यता वर्तवल्याने जागतिक आणि देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला.

दरम्यान, जागतिक बाजारातही सोन्याचे भाव घसरल्याचे पाहिला मिळाले. अमेरिकेतील सोन्याचे फ्युचर्स 1.2 टक्क्यांनी कमी होऊन प्रति औंस 3350 डॉलरवर आले. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये व्यापार करार झाला. तर अमेरिकन डॉलर आणखी मजबूत होईल. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक काढून घेऊ शकतात. कारण, डॉलर मजबूत झाल्यावर सोन्याचे आकर्षण कमी होते आणि त्याचे दर आणखी खाली जाऊ शकतात.

…तर नुकसानीची शक्यताच जास्त

सध्या सोन्याचे भाव थोडे-फार फरकाने कमी झाले आहेत. असे असले तरी, दीर्घ कालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे जेव्हा बाजारात सोन्याचे भाव कमी होतात, तेव्हा ती गुंतवणुकीची चांगली संधी मानली पाहिजे. मात्र, प्रत्यक्ष सोनं (ऑफलाईन) खरेदी करणे थोडे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे जर तुम्ही दागिन्यांमध्ये गुंतवणूक करत असाल तर नुकसान होण्याची शक्यता आहे.

सोन्याचे दर उतरले

भारतीय कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) गुरुवारी सोन्याच्या फ्युचर्स दरात मोठी घट झाली. जवळपास ०.४८% नी दर कमी झाला आणि १० ग्रॅम सोन्याचा भाव ९६,६२० रुपयांवर आला. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे भारतात सोन्याची मागणी वाढू शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Gold rate may down due to india pakistan war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • Gold Jewellery
  • Indo-Pak Relation

संबंधित बातम्या

Emergency Gold Loan: आपत्कालीन परिस्थितीत सोने कर्ज का ठरते Best Option?
1

Emergency Gold Loan: आपत्कालीन परिस्थितीत सोने कर्ज का ठरते Best Option?

Maharashtrian Peacock Nath: नऊवारी साडीवर उठावदार दिसतील ‘या’ डिझाईनच्या मोर नथ, दिसाल सुंदर आणि देखण्या
2

Maharashtrian Peacock Nath: नऊवारी साडीवर उठावदार दिसतील ‘या’ डिझाईनच्या मोर नथ, दिसाल सुंदर आणि देखण्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.