इंडिगोच्या गुवाहाटी-चेन्नई विमानाचं बेंगळुरूमध्ये इमर्जन्सी लँडिंग; Mayday कॉलमुळे प्रवाशांमध्ये दहशत
गुवाहाटीहून चेन्नईकडे निघालेल्या इंडिगोच्या फ्लाइटचं ( 6E-6764, एअरबस A321)इंधनाच्या तुटवड्यामुळे बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं लागलं. यादरम्यान काहीकाळ विमानातील १६८ प्रवाशांची जीव टांगणीला लागला होता. चेन्नई विमानतळावर लँडिंग करताना ‘गो अराउंड’ म्हणजेच अचानक लँडिंग थांबवून पुन्हा आकाशात झेप घेण्याचा निर्णय पायलटनं घेतला. त्यानंतर लगेचच “Mayday” कॉल देण्यात आला. त्यामुळे काहीवेळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं.
गुवाहाटीहून सायंकाळी 4:40 वाजता उड्डाण घेणाऱ्या या विमानाचं चेन्नईमध्ये सायं 7:45 वाजता लँडिंग होणं अपेक्षित होतं. मात्र लँडिंग गियर रनवेवर टेकल्यावर काही क्षणातच पायलटनं गो अराउंड केलं. लँडिंगवेळी “अस्थिर स्थिती” म्हणजेच unstable approach ची परिस्थिती निर्माण झाली होती. विमान बेंगळुरू विमानतळापासून अवघ्या 35 मैलांवर होतं आणि त्याक्षणी पायलटनं मेडे कॉल दिला.
“आम्ही अचानक उंच झेप घेतल्यामुळे अनेक प्रवासी जागेवरून उठले, घाबरून गेले. खूपच अस्वस्थता आणि भीती वाटली.” अशी माहिती प्रवाशांनी दिली. मेडे कॉल मिळाल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलनं (ATC) तत्काळ ग्राउंड स्टाफला सतर्क केलं. वैद्यकीय पथक आणि अग्निशमन कर्मचारी रनवेवर तैनात करण्यात आले. अखेरीस रात्री 8:20 वाजता विमान बंगळुरू विमानतळावर सुरक्षित उतरलं. तेव्हा प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
चेन्नई विमानतळावर प्रचंड ट्रॅफिकमुळे विमान डायव्हर्ट करण्यात आल्याचं कारण इंडिगोने एका निवेदनातून दिलं होतं. मात्र चेन्नई ATCच्या सूत्रांनी हे कारण फेटाळून लावतं विमानात आवश्यक तेवढं डायव्हर्जनसाठीचं इंधन शिल्लक नव्हतं, असं म्हटलं आहे.
Covid-19 Cases: कोरोनारूपी राक्षस वाढतोय? 6 महिन्यात तब्बल120 मृत्यू; बाधितांचा आकडा पोहोचला…
नुकताच अहमदाबादमध्ये लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान क्रॅश झालं. जवळपास ३०० लोकांचा यात मृत्यू झाला. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्यानंतर आधीच हवाई सुरक्षेविषयी चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत इंडिगोच्या या घटनेमुळे ईंधन व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद आणि वैमानिक निर्णयक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ही घटना केवळ एखाद्या तांत्रिक त्रुटीची नाही, तर संपूर्ण विमान व्यवस्थापन आणि नियोजनाबाबत चिंता व्यक्त करणारी आहे.