Hari Shankar Jain commented on the temple-mosque controversy
दिल्ली : देशामध्ये हिंदू मंदिर आणि मुस्लीम मशीद या मुद्द्यांवरुन वाद सुरु आहेत. अनेक मशीद या मंदिर पाडून बववल्या असल्याचे आरोप देखील केले जात आहेत. त्यामुळे अनेक मशीदींची सर्वेक्षणे सुरु आहेत. अयोध्येच्या राम मंदिरानंतर अशा अनेक मंदिरांचा मुद्दा प्रकाशात आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वक्तव्यानंतर आता काशी, मथुरा, भोजशाळा, संभल येथील याचिकाकर्ते हरी शंकर जैन यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
हरी शंकर जैन यांनी भारतातील महत्त्वाच्या मंदिरांबाबत याचिका दाखल केलेली आहे. त्यांनी एका वाहिनीशी संवाद साधताना हिंदू मंदिर परत मिळवणार असल्याचा निश्चय पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. यावेळी हरी शंकर जैन म्हणाले की, “ना एक मंदिर सोडणार, ना एक इंच सोडणार, ना कुणाला समजावणार, ना कुणाला समजणार. देवाच्या नावाने घेतलेला संकल्प कधीच करारात मोडत नाही,” असा आक्रमक पवित्रा हरी शंकर जैन यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माध्यमांशी संवाद साधताना हरीशंकर जैन म्हणाले की, “मशीद बांधण्यासाठी जे काही मंदिर पाडले आहे, त्यातील एकही मंदिर किंवा एक इंचही शिल्लक राहणार नाही. तीन देणे आणि बाकीचे सोडणे ही विचारधारा गुलामगिरीचे लक्षण आहे. यामधून ही आक्रमणकर्त्यांची भीती दर्शवते, असा दावा हरी शंकर जैन यांनी केला आहे. त्याचप्रमाणे मूठभर लोक संपूर्ण हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत आणि ते तडजोड करतील,” असे स्पष्ट मत हरी शंकर जैन यांनी व्यक्त केले आहे.
अयोध्या, काशी आणि मथुरेचे विशेष महत्त्व
हरिशंकर जैन यांच्या म्हणण्यानुसार, “जे हिंदू आज तडजोडीबद्दल बोलत आहेत ते स्वतःच्या पायावर गोळी झाडत आहेत. ज्याप्रमाणे अयोध्या काशी मथुरेचे स्वतःचे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी इतर मंदिरांचेही महत्त्व आहे. मंदिर पाडून आज जी मशीद बांधली गेली. अशा परिस्थितीत जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कायदेशीर लढाई लढून आज मशिदीत रूपांतरित झालेली 5 हजार, 10 हजार मंदिरे परत घेईन,” असा इशारा हरी शंकर जैन यांनी दिला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ना कोणाला समजावता येईल ना आम्हाला समजेल
हरीशंकर जैन यांनी सर्व मंदिरे परत घेण्याचा संकल्प केला आहे. ते म्हणाले की, “देवाच्या नावाने घेतलेला ठराव कराराने मोडता येत नाही. अशा परिस्थितीत तो आपल्याला समजू शकतो, असे जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. ना कोणी समजावणार ना आम्हाला समजणार. जे तडतोड करत आहेत ते लोकं इतिहासावर अन्याय करत असून त्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही,” असे मत हरी शंकर जैन यांनी व्यक्त केले आहे.