Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन महिला शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी, एकमेकींना लोळून लोळून मारलं…

बिहारमधील दोन महिला शिक्षकांमध्ये झालेली फ्री स्टाईल सर्वाधिक चर्चेत आहे. येथील पुरुषांसोबत महिलाही मारापिटी करण्यात कुठे कमी नाहीत, हेच सिद्ध करणारी ही घटना आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 26, 2023 | 01:21 PM
दोन महिला शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी, एकमेकींना लोळून लोळून मारलं…
Follow Us
Close
Follow Us:

शाळेत मुलं सर्वधिक वेळ घालवतात. शाळेत शिकलेल्या गोष्टींचा थेट परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे शाळा निवडताना पालक योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जर शाळेतील शिक्षकच लहान मुलांसारखं वागायला लागले तर?? पालक आणि मुलांनी बघायचं कोणाकडे? बिहार या राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर बोलूच नये, अशी अवस्था झालीये. अशातच आता बिहारमधील शिक्षिकांचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. बिहारमधील दोन महिला शिक्षकांमध्ये झालेली फ्री स्टाईल सर्वाधिक चर्चेत आहे. येथील पुरुषांसोबत महिलाही मारापिटी करण्यात कुठे कमी नाहीत, हेच सिद्ध करणारी ही घटना आहे.

पाटणा जिल्ह्यातील बिहटा ब्लॉकमधील कौडिया पंचायतीच्या माध्यमिक शाळेतील ही घटना आहे. येथील दोन महिला शिक्षकांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. रोज काहीतरी निमित्त निघून त्यांची भांडणं व्हायची. अश्यात काल भांडण विकोपाला गेले आणि दोघी एकमेकींना मारहाण करू लागल्या. सुरुवातीला सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लवकरच भांडण आटोक्यात येईल असे वाटले होते.

शाळेच्या इमारतीपासून ही मारापिटी सुरू झाली होती. ती बघता बघता गावातील एका शेतापर्यंत पोहोचली. दोघीही एकमेकींना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारत आहेत. एवढेच नव्हे तर झिंज्याही उपटत आहेत. दोन माणसं भांडतात तसे ते हे भांडण सुरू होते. गावकऱ्यांसाठी हे एका दृष्टीने मनोरंजन होते आणि तसे बघितले तर वाईटही होते. त्यामुळे अनेक लोक त्यांना सोडवायला गेले. पण त्यांनाही मारच खावा लागला.

मारापिटीत तल्लीन

दोघीही एकमेकींना मारण्यात इतक्या तल्लीन झाल्या होत्या की, त्यांना आपण शाळेतून निघून शेतापर्यंत येऊन पोहोचलोय, याचे भानच नव्हते. विशेष म्हणजे त्यात एकीच्या मैत्रीणीने भांडणात एन्ट्री घेतली आणि तिनेही आपल्या मैत्रीणीच्या बचावासाठी पहिलीला मारायला सुरुवात केली. तिने तर चक्क पायातली चप्पल काढून सपासप मारायला सुरुवात केली. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली. दोन्ही बाजुंनी तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

शाळेतल्या शिक्षकच एकमेकींसोबत भांडत असल्यामुळे मुलांची हिंमत वाढली. त्यात काही उपद्रवी विद्यार्थ्यांनी हीच योग्य संधी आहे, हे ध्यानात घेऊन मोबाईल काढला आणि व्हिडियो शूट केला. या भांडणाचे व्हिडियो बघता बघता काही क्षणात अख्ख्या देशात व्हायरल झाले.

Web Title: Heavy fight between two women teachers they beat each other nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2023 | 01:16 PM

Topics:  

  • bihar
  • patna

संबंधित बातम्या

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
1

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

Bihar Election 2025 : १०० रुपये परीक्षा शुल्क, उद्योगांना अनुदान; गांधी मैदानातून नितीश कुमार यांच्या ४ मोठ्या घोषणा
2

Bihar Election 2025 : १०० रुपये परीक्षा शुल्क, उद्योगांना अनुदान; गांधी मैदानातून नितीश कुमार यांच्या ४ मोठ्या घोषणा

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन ओळखपत्रं,आयोगाचा अजब कारभार
3

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन ओळखपत्रं,आयोगाचा अजब कारभार

मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख लोक कोण आहेत? तीन दिवसांत सर्वांची माहिती सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
4

मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख लोक कोण आहेत? तीन दिवसांत सर्वांची माहिती सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.