तामिळनाडूच्या अनेक भागात पावसाचा जोर; हवामान विभागाकडून 'या' भागांसाठी रेड अलर्ट जारी
चेन्नई: तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. भारत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा लवकरच तीव्र होण्याची शक्यात आहे. त्याते रुपांतर दाट निम्न दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होईल. चेन्नईसह चेंगलपेट, कांचीपुरम, तिरुवल्लूर, तसेच उत्तरेकडील किनारपट्टीवरचे कडलूर आणि कावेरी डेल्टाच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी सौम्य ते मध्यम पाऊस झाला असून काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे.
वाहतुकीवर परिणाम
पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा चैन्नईच्या आग्नेय दिशेला 830 किमी आणि नागपट्टिनमपासून 630 किमी अतंरावर आहे RMC च्या विभागाने म्हटले आहे की, हा पट्टा उत्तरेस-उत्तरपश्चिम दिशेला सरकत असून पुढील 12 तासांत तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत हा पट्टा श्रीलंका-तामिळनाडू किनाऱ्यांच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
रेड आणि यलो अलर्ट जारी
भारत हवामान विभागाने तामिळनाडूच्या तीन मध्यवर्ती जिल्ह्यांसाठी 26 नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे, तर 27 नोव्हेंबरसाठी दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चेन्नईसाठी 27 ते 29 नोव्हेंबरदरम्यान जोरदार पावसाचा यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. कांचीपुरम, तिरुवल्लूर आणि चेंगलपेट जिल्ह्यांना 27 ते 30 नोव्हेंबरदरम्यान यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत.
पावसामुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पाऊस अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाच्या अंदाजानुसार प्राधिकरणाने तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, डेल्टा जिल्ह्यांमध्ये, विशेषतः नागपट्टिनम, मयिलादुथुराई आणि तिरूवरूर येथे शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपेट येथे 28 व 29 नोव्हेंबरला काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर कमी दाबाचा पट्टा किनाऱ्यावर आला, तर पावसाचा जोर अंतर्भागाकडे सरकण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
IMD चेन्नई ने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई आणि इतर उपनगरांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. कमाल तापमान 29 अंश सेल्सियस ते 30 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.