बंगळुरू : देशभर गाजलेल्या हिजाब प्रकरणावर काही दिवसांपूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला. यावेळी हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले होते. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी हिजाब घालू देण्याच्या मागणीसाठी परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. दरम्यान, कर्नाटकमध्ये हिजाबमुळे प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकणाऱ्या शेकडो प्री-युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्याची दुसरी संधी मिळणार नाही(Hijab protesters hit students; Those who boycott exams have no second chance).
वर्गात हिजाब घालण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी मुलांनी परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. कर्नाटकात बारावीच्या वर्गाला पीयू-II म्हणतात. यापूर्वी, सरकारने या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची आणखी एक संधी देण्याचे संकेत दिले होते. मात्र,परीक्षेदरम्यान गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले.
[blockquote content=”आम्ही या शक्यतेचा विचार कसा करू शकतो? हायकोर्टाने अंतरिम आदेश दिल्यानंतरही हिजाब घालण्याची परवानगी दिली नाही म्हणून प्रॅक्टिकलवर बहिष्कार टाकणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही परीक्षेला बसू दिले तर दुसरे विद्यार्थी इतर काही कारण सांगून येतील आणि दुसरी संधी मागतील. ” pic=”” name=”- बी.सी. नागेश, शिक्षणमंत्री”]
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]