पुणे विभागात वीजचोरीची सर्वाधिक ७३ प्रकरणे उघड (फोटो- ai gemini)
वीजचोरीमुळे होणारी महसुलाची गळती रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. यामध्ये कोकण प्रादेशिक विभागात ५३, पुणे विभागात ७३, छत्रपती संभाजीनगर विभागात ५६, तर नागपूर विभागात ६८ वीजचोरीची प्रकरणे आढळली. या सर्व प्रकरणांचे मूल्यांकन करून संबंधित ग्राहकांना सहा कोटी २७ लाख रुपयांची देयके देण्यात आली आहेत.
Pune MSEB: वीजबिल भरायला पुणेकरांची टाळाटाळ? तब्बल ‘इतक्या’ कोटींची थकबाकी
या कारवाईत २४० ग्राहकांविरुद्ध विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अन्वये, तर अनधिकृत वीज वापराच्या दोन प्रकरणांत कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली आहे. वीजचोरीचे देयक आणि दंडाची रक्कम निर्धारित मुदतीत न भरणाऱ्या ग्राहकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. दरम्यान, थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांनी केले आहे.
महावितरणच्या तीन दिवसीय विशेष मोहिमेत पुणे प्रादेशिक विभागात सर्वाधिक ७३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. त्याखालोखाल नागपूर विभागात ६८, छत्रपती संभाजीनगर विभागात ५६, तर कोकण विभागात ५३ प्रकरणे आढळली.
प्रादेशिक विभाग वीजचोरीची प्रकरणे
पुणे – ७३
नागपूर – ६८
छत्रपती संभाजीनगर – ५६
कोकण – ५३
एकूण – २५०
Ans: महावितरणने राज्यभरात राबवलेल्या विशेष मोहिमेत अवघ्या तीन दिवसांत वीजचोरीची २५० प्रकरणे उघडकीस आणली.
Ans: पुणे प्रादेशिक विभागात सर्वाधिक ७३ वीजचोरीची प्रकरणे आढळली. त्यानंतर नागपूर विभागात ६८, छत्रपती संभाजीनगर विभागात ५६ आणि कोकण विभागात ५३ प्रकरणे उघडकीस आली.






