मंडी: हिमाचल प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. हिमाचल प्रदेशच्या बसला मोठा अपघात झाला आहे. हिमाचल प्रदेशची एक प्रवासी बस थेट दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये ७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हिमाचल प्रदेश परिवहन मंडळाच्या बसला मंडी जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट दरीत जाऊन कोसळली आहे. यामध्ये ७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १८ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याचे समजते आहे. हा अपघात मंडी जिल्ह्यापासून ६० किलोमीटर दूर तरंगला या ठिकाणी झाला आहे.
बसचे नियंत्रण गेल्याने बस थेट दरीत जाऊन कोसळली. या बसमधून २५ प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी देखील तातडीने बचकार्यात मदत करण्यास सुरुवात केली.जखमी प्रवाशाना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी प्रवाशाना सरकाघाट येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळेझाला याचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही. मात्र बसचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामध्ये ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १८ लोक जखमी झाले आहेत. या घटनेत अनेक प्रवाशांची प्रकुती गंभीर असल्याचे समजते आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जात आहेत. बचावकार्य अजूनही सुरूच आहे. पोलीस पुढीलतपास करत आहेत, याबाबत मंडी जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
या अपघातावर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांनी दुःख व्यक्त केले आहे. मंडी जिल्ह्यातील सरकाघाट येथे हिमाचल प्रदेशच्या बसला झालेल्या अपघातात ७ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी दुःखदायक आहे.
मंडी ज़िला के सरकाघाट उपमंडल के मसेरन के निकट तारंगला में एचआरटीसी बस के खाई में गिरने से अब तक सात लोगों के निधन का समाचार अत्यंत दुःखद एवं हृदयविदारक है।
घायलों को तुरंत अस्पताल पहुँचाने और उपचार दिलाने के लिए ज़िला प्रशासन को निर्देश जारी कर दिये गये हैं।
दुःख की इस घड़ी…
— Sukhvinder Singh Sukhu (@SukhuSukhvinder) July 24, 2025
जखमी प्रवाशाना रुग्णालयात दाखल करण्याचे व उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली
काही दिवस आधी हिमाचल प्रदेशमध्ये अलकनंदा नदीत बस कोसळून अपघात घडला होता. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. तर ७ प्रवाशांना वाचवण्यात यश आले होते. घटनेच्या ठिकाणी बचाव पथक, स्थानिक पोलीस, एसडीआरएफचे पथक दाखल झाले होते.मोठ्या वेगाने या ठिकाणी बचावकार्य राबवण्यात आले होते. यापूर्वी देखील केदारनाथ आणि रुद्रप्रयागमध्ये अपघात झाल्याची घटना घडली. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरला देखील अपघात घडल्याची घटना घडली होती.