How Government Bungalow Allotted To MP: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज (11 ऑगस्ट) नवी दिल्लीतील बाबा खरक सिंग मार्गावर खासदारांसाठी १८४ नव्याने बांधलेल्या टाइप-७ बहुमजली फ्लॅट्सचे उद्घाटन करण्यात आले. खासदारांच्या गरजा लक्षात घेता हे फ्लॅट्स बांधण्यात आले आहेत. प्रत्येक फ्लॅट ५००० चौरस फूट इतक्या क्षेत्रफळाचे आहेत. ज्यात कार्यालयासह कर्मचाऱ्यांसाठी जागा देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या इमारती भूकंप प्रतिरोधक तसेच अपंगांसाठी अनुकूल आहेत. खासदारांच्या कार्यात्मक गरजा पूर्ण होऊ शकतील, अशा उद्देशाने या फ्लॅट्सचा परिसर विकसित कऱण्यात आला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, खासदारांना बंगले कसे मिळतात आणि पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या फ्लॅट्समध्ये कोणते खासदार राहू शकतात?
पंतप्रधान वापरत असलेल्या चार टॉवर्सची नावे कृष्णा, गोदावरी, हुगळी आणि कोसी अशी आहेत. चारही नावे देशातील महान नद्यांच्या नावावर आहेत. या नद्या कोट्यवधी लोकांसाठी जीवनदायिनी आहेत. देशातील विविध राज्यांमधील आणि प्रदेशातील १८० हून अदिक खासदार या फ्लॅट्समध्ये राहणार आहेत. खास बाब म्हणजे, टाईप-8 बंगल्यांपेक्षा हे फ्लॅट्स आकाराने मोठे असून ते सरकारी निवासासाठी सर्वोत्त श्रेणीचे ठरणार आहेत. या इमरतींमध्ये एक कम्युनिटी सेंटरचीही उभारणी करण्यात आली असून याठिकाणी खासदारांचे सामाजिक आणि अधिकृत बैठकांचे केंद्र असेल.
गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीच्या लुटियन्स झोनमध्ये केंद्रीय मंत्री आणि खासदारांच्या निवासस्थाांची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी जनरल पूल रेसिडेन्शियल अकोमोडेशन अॅक्टच्या अटी-शर्तीही पाळल्या जातात. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने, १९२२ मध्ये स्थिती संचालनालय असा एक नवा विभाग तयार करण्यात आला होता. हा विभागातकडून देशभरातील केंद्र देशभरातील केंद्र सरकारच्या मालमत्तांची देखरेख केली जाते. मंत्री आणि खासदारांच्या बंगल्यांची आणि फ्लॅटची काळजी घेणे, वाटप करणे आणि रिकामे करणे ही देखील या विभागाची जबाबदारी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेची गृहनिर्माण समिती आणि स्थिती संचालनालय हे विभाग खासदारांना घरे वाटप करण्याच मोठी भुमिका बजावतात. तर जनरल पूल रेसिडेन्शियल अकोमोडेशन अॅक्टच्या अंतर्गत खासदार आणि मंत्र्यांना घराचे वाटप केले जाते.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
संसदेतील खासदारांना त्यांच्या ज्येष्ठता आणि पदाच्या श्रेणीनुसार निवासस्थाने दिली जातात. सर्वात लहान प्रकार-१ ते प्रकार-४ निवासस्थाने प्रामुख्याने केंद्रीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात येतात. यापुढील प्रकार-६ ते प्रकार-८ मधील बंगले आणि प्रशस्त निवासस्थाने केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री तसेच खासदारांसाठी राखीव असतात. पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांना प्रामुख्याने प्रकार-५ बंगले दिले जातात. तर, एखादा खासदार एकापेक्षा जास्त वेळा निवडून आल्यास त्याला प्रकार-६ किंवा प्रकार-७ बंगले मिळतात. सर्वोच्च दर्जाचे प्रकार-८ बंगले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, कॅबिनेट मंत्री, माजी राष्ट्रपती, माजी उपराष्ट्रपती, माजी पंतप्रधान आणि वित्त आयोगाचे अध्यक्ष अशा उच्चपदस्थांना दिले जातात.