अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के शुल्काबाबतही चिंता
Prithviraj Chavan Controversial Statement: अमेरिकन लष्कराकडून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण करत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेवर जगभरातून टीका होत आहे. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यवरही टिकास्त्र सोडत आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय प्रतिक्रियांची लाट उसळली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावरील अमेरिकेच्या कारवाईवर भाष्य करताना वादग्रस्त विधान केले. “डोनाल्ड ट्रम्प आमच्या पंतप्रधानांचेही अपहरण करतील का?” असा उपरोधिक सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. व्हेनेझुएलात घडलेल्या घटनेसारखेच काही भारतात घडू शकते का, डोनाल्ड ट्रम्प नंरेंद्र मोदींटेची अपहरण करतील, असा प्रश्न विचारला आहे. पंतप्रधान मोदींवरील त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के शुल्काबाबतही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, “इतक्या उच्च दराने कोणताही व्यापार शक्य नाही. त्यांच्या मते, अमेरिकेने शुल्क लादून भारतातून निर्यात जवळजवळ थांबवली आहे. अमेरिकेत निर्यातीतून भारतीयांना मिळणारा नफा आता मिळणार नाही. भारताला हा फटका सहन करावा लागेल आणि नवीन बाजारपेठ शोधावी लागेल. जर व्यापार आधीच ठप्प झाला आहे, तर,५० टक्के शुल्क लादल्यानेही फारसा फरक पडणार नाही.
माजी डीजीपी शेष पॉल वैद्य यांचा पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावर तीव्र आक्षेप
जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) शेष पॉल वैद्य यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना एक संतुलित, अनुभवी आणि परिपक्व नेते म्हणून ओळखले जात होते; मात्र त्यांच्या अलीकडील विधानांवरून काही काँग्रेस नेत्यांमध्ये मोठी निराशा आणि अस्वस्थता निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसते, असे वैद्य यांनी म्हटले.
शेष पॉल वैद्य यांनी अशा विधानांना थेट देशविरोधी ठरवत कठोर शब्दांत निषेध नोंदवला. “भारतामध्ये व्हेनेझुएलासारखी परिस्थिती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा कोणताही जबाबदार नेता कसा काय करू शकतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारच्या धोरणांवर टीका करणे हा लोकशाहीतील मूलभूत अधिकार आहे, याची त्यांनी कबुली दिली; मात्र देशाच्या सन्मानावर, संविधानिक संस्थांवर आणि पंतप्रधान कार्यालयाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अयोग्य आणि धोकादायक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. माजी डीजीपींनी पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान “लज्जास्पद” असल्याचे म्हटले असून, अशा प्रकारचे विचार देशाच्या राष्ट्रीय हिताशी सुसंगत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Title: Prithviraj chavan on donald trump will trump kidnap prime minister modi prithviraj chavans statement has sparked a political controversy