Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Election : सायंकाळी ५ नंतर मतदानाचा टक्का कसा वाढतो? निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

महाराष्ट्र विधानसभेच्या नोव्हेंबरमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या मतदानादिवशी सायंकाळी ५ नंतर अचानक मतनाचा टक्का वाढला होता. त्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 07, 2025 | 05:21 PM
सायंकाळी ५ नंतर मतदानाचा टक्का कसा वाढतो? निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

सायंकाळी ५ नंतर मतदानाचा टक्का कसा वाढतो? निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र विधानसभेच्या नोव्हेंबरमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या मतदानादिवशी सायंकाळी ५ नंतर अचानक मतनाचा टक्का वाढला होता. त्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दरम्यान आज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. यावेळी निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी यावर भाष्य केलं आहे.

दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान आणि ८ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. पत्रकार परिषदेत राजीव कुमार अतिशय आक्रमक पहायला मिळाले. शेवटचे मतदान आणि निकालानंतर उपस्थित झालेल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, हे अव्याहतपणे सुरू आहे, परंतु अलीकडेच आणखी एक प्रश्न उपस्थित केला गेला की सायंकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढते?

Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभेआधी केजरीवालांचा खळबळजनक दावा; म्हणाले, “येत्या काळात सिसोदियांच्या…”

पत्रकारांशी संवाद साधताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, सायंकाळी ५ नंतर मतदानाची टक्केवारी कुठे वाढली याचं आज स्पष्टीकरण द्यावं लागले. निवडणुकीत अनेकदा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मतदारांच्या संख्येवरही प्रश्न उपस्थित होत असल्याचं ते म्हणाले. सुरुवातीला मतदारांमध्ये मिस मॅच झाल्याचं बोललं जात होतं. मतमोजणीमध्ये जास्त कमतरता दाखवून मतमोजणी मंदावली, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

देशभरात किती बूथ, किती अधिकारी?

या सगळ्याचा खुलासा आज आवश्यक असल्याचे राजीव कुमार म्हणाले. ते म्हणाले की, देशभरात सुमारे 10.5 लाख बूथ आहेत. प्रत्येक बूथवर ४ ते ५ मतदान अधिकारी आहेत. हे जोडले तर 45-50 लाख लोक होतात. हे सर्व लोक एकाच राज्यातील असून त्यांच्याकडे वेगवेगळी कौशल्ये आहेत. ते म्हणाले की, ज्याप्रकारे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यावरून असे दिसते आहे की, इतके लोक काहीतरी गडबड करण्यासाठी बसले आहेत. पण हे शक्य नाही. तिथे सर्व पक्षांचे प्रतिनिधी असतात.

राजीव कुमार म्हणाले की 2020 पासून एकूण 30 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. १५ राज्यांमध्ये वेगवेगळे मोठे पक्ष म्हणून उदयास आले आहेत, हेच लोकशाहीचं सौंदर्य आहे. निष्पक्ष निवडणुकांचं हे लक्षण आहे. यावरून मतदार किती हुशार आहेत, हे स्पष्ट होते. ते म्हणाले की, निकालाच्या आधारे प्रक्रिया समजू शकत नाही. मतदानाच्या सुरुवातीच्या प्रक्रियेपासून निकाल लागेपर्यंत संपूर्ण पारदर्शकता राखली जाते. कोणत्याही प्रकारच्या गैरकृत्याचा आरोप हा निव्वळ संशय आहे.

Atishi Marlena : रमेश बिधुडी यांचं दिल्लीच्या मुख्यमंत्र्याविषयी वादग्रस्त विधान; भर पत्रकार परिषदेत आतिशी यांना अश्रू अनावर

पोलिंग एजंटच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया

पोलिंग एजंट सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदान केंद्रातच असतात. ते रोज मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतात. सर्व काही त्यांच्या समोर घडतं. कोणाला मतं पडली आणि कोणाची मतं पडली नाहीत या सर्व नोंदी ते ठेवतात. संध्याकाळी मतदान संपण्यापूर्वी, मतदान केंद्र सोडण्यापूर्वी, फॉर्म 17C भरला जातो, ज्यामध्ये मतांची संख्या नोंदवली जाते.

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, लोकशाहीत प्रश्न विचारणे महत्त्वाचे असते पण त्या प्रश्नांची उत्तरेही महत्त्वाची असतात. या दरम्यान त्यांनी एक दोन शायरीही ऐकवल्या. सर्व प्रश्न महत्वाचे आहेत, उत्तर नेहमीच तयार असते, सवय म्हणून लिखित उत्तरे देत राहा, आजही आपण समोरासमोर आहोत, उद्या असू की नाही कुणाला माहिती, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: How does voting percentage increase after 5 pm election commission chief rajeev kumar answer during delhi election date announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • Chief Election Commissioner Rajiv Kumar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.