रमेश बिधुडी यांचं दिल्लीच्या मुख्यमंत्र्याविषयी वादग्रस्त विधान; भर पत्रकार परिषदेत आतिशी यांना अश्रू अनावर
भाजप नेते रमेश बिधुरी यांनी कॉंग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यानंतर वादंग उठलं असतानाच आज पुन्हा त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द काढले. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषद घेत यावर आक्षेप घेतला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. माझे वडील 80 वर्षांचे झाले आहेत. त्यांनी हजारो मुलांना शिकवलं आहे. ते इतके आजारी असतात की त्यांना आधाराशिवाय चालताही येत नाही. रमेश बिधुरी यांनी त्यांच्या कामावर मते मागावीत. माझ्या वडिलांना शिव्या देऊन मते मागू नका, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
#WATCH | Delhi CM Atishi breaks down while speaking about BJP leader Ramesh Bidhuri’s reported objectionable statement regarding her. pic.twitter.com/CkKRbGMyaL
— ANI (@ANI) January 6, 2025
रमेश बिधुरी यांच्या अपमानास्पद वक्तव्यावर आप खासदार संजय सिंह यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. मोदी जी तुम्हाला शिकवतात? अतिशी यांचे वडील 80 वर्षांचे आणि वृद्ध आहेत. त्यांच्यावर असा पद्धतीने अपमानास्पद व्यक्तव्य केली जातात. आधी संसदेत शिवीगाळ करणाऱ्यांना तिकीट दिलं. मग निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली. भाजपला वाटतं की ते एक चांगला उमेदवार असू शकतात कारण तो महिलांवर खालच्या पातळीवर टीका करतात. ही भाजपची विचारसरणी आहे. ही नरेंद्र मोदींची विचारसरणी आहे. भाजपचा मुख्यमंत्री चेहरा रमेश बिधुरी असल्याचे सिद्ध झाले आहे, असा घणाघात त्यांनी केला.
संजय सिंह म्हणाले की, आता दिल्लीच्या जनतेने ठरवायचे आहे की त्यांना महिलांना २१०० रुपये देणारे अरविंद केजरीवाल हवे आहेत की महिलांवर चुकीच्या आणि घाणेरड्या भाषेत टीकाटिप्पणी करणारे रमेश बिधुरी. भाजप रमेश बिधुरी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवणार आहे. कालपासून त्याची कीर्ती वाढली आहे. रमेश बिधुरी हवे की अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील जनतेने ठरवायचं आहे.
काय म्हणाले होते रमेश बिधुरी?
कालकाजी येथील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी मुख्यमंत्री आतिशी यांच्या वडिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होतं. ते म्हणाले की आतिशी आधी मार्लेना होत्या आणि नंतर सिंग बनल्या. केजरीवाल यांनी मुलांच्या रक्षणाची शपथ घेतली होती पण आतिशीने वडील बदलले, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर दिल्लीत वादंग उठलं आहे. त्याआधी त्यांनी, दिल्लीचे रस्ते प्रियांका गांधी यांच्या गालासारखे लाल लाल करणार असल्यांचं वक्तव्य केलं होतं.