Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air India Hard Landing: हैदराबाद-फुकेत विमानाचे ‘हार्ड लँडिंग’; १३३ प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले

आपत्कालीन प्रोटोकॉल अंतर्गत विमानातील सर्व १३३ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणताही प्रवासी किंवा क्रू मेंबर जखमी झाला नाही ही दिलासादायक बाब आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 11, 2026 | 03:01 PM
Hyderabad-Phuket flight makes 'hard landing'; 133 passengers narrowly escape

Hyderabad-Phuket flight makes 'hard landing'; 133 passengers narrowly escape

Follow Us
Close
Follow Us:
  • एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बुधवारी (११ मार्च) दुपारी लँडिंगदरम्यान भीषण अपघात
  • ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ विमानाचा वेग अधिक असल्याने धावपट्टीवर उतरताना ‘हार्ड लँडिंग’ झाले
  • वैमानिक आणि क्रू मेंबर्सनी तत्परता दाखवत आपत्कालीन प्रोटोकॉलनुसार सर्व १३३ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले
 

Air India Hard Landing: हैदराबादहून फुकेतला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बुधवारी (11 मार्च ) दुपारी लँडिंग दरम्यान अपघात झाला. धावपट्टीवर उतरताना विमानाचा नोज गियर तुटला आणि विमानाचे पुढचे चाक वेगळे झाले. या घटनेनंतर धावपट्टी काही काळासाठी बंद करण्यात आली होती. पण विमानातील सर्व १३३ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले, प्राथमिक माहितीनुसार विमानातील प्रवाशांना कोणतीही दुखापत कोणतीही दुखापत झाली नाही पण प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले. असं बोलले जात आहे.

No-confidence motion : अविश्वास ठरावावर लोकसभेत जोरदार चर्चा; राहुल गांधींनी केले ‘हे’ गंभीर आरोप

हार्ड लँडिंगनंतर नोज गियर तुटला

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कंपनीचे बोईंग ७३७ मॅक्स ८ विमान लॅंडिंग होत असताना विमानाचा वेग खूप होता. ज्यामुळे विमानाचे नोज व्हील वेगळे झाले आणि नोज लँडिंग गियर खराब झाला. थाई इन्क्वायररच्या सोशल पोस्टनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने फुकेत विमानतळावर हार्ड लँडिंग केल्यानंतर सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. घटनेनंतर लगेचच, विमानतळ अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव धावपट्टी तात्पुरती बंद केली. यामुळे काही इतर उड्डाणांच्या कामकाजावर परिणाम झाला आणि अनेक उड्डाणांच्या हालचाली विस्कळीत झाल्या.

आपत्कालीन प्रोटोकॉल अंतर्गत विमानातील सर्व १३३ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणताही प्रवासी किंवा क्रू मेंबर जखमी झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. एअरलाइनने जारी केलेल्या निवदेनानुसार, क्रूने सर्व मानक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विमान सध्या विमानतळावर उभे आहे. रनवे बंद असल्याने, अनेक विमानांना हवेतच वळावे लागले. अनेक विमाने क्राबी आणि सुरत थानी सारख्या जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आली. विमानतळ प्राधिकरणाच्या मते, विमानांच्या संख्येमुळे संध्याकाळपर्यंत विलंब होऊ शकतो.

Passive Euthnasia Case : इच्छामरण म्हणजे काय? 13 वर्षांपासून कोमात असणाऱ्या हरीश राणाची ‘मृत्यूची इच्छा’ कशी पूर्ण होणार?

नोज गियर का महत्त्वाचे आहे?

विमानाचा नोज गियर हा लँडिंग सिस्टीमचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो विमानाच्या पुढच्या भागाला आधार देतो आणि टॅक्सींग, टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान दिशात्मक नियंत्रणात मदत करतो. तांत्रिक पथके सध्या या घटनेची चौकशी करत आहेत आणि लँडिंग दरम्यान बिघाड कसा झाला हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट flightradar24.com नुसार, फ्लाइट IX 938 हैदराबादहून सकाळी 6:20 वाजता निघण्याच्या नियोजित वेळेऐवजी सकाळी 6:42 वाजता निघाली आणि स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:40 वाजता फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. सुमारे 11:55 वाजता, विमानतळ अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की विमानाने कठोर लँडिंग केले आहे, ज्यामुळे पुढील लँडिंग गियरचे नुकसान झाले आहे.

 

 

Web Title: Hyderabad phuket flight makes hard landing 133 passengers narrowly escape

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Air India latest news
  • Air India Plane Accident
  • plane crash news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.