Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Weather Forecast: देशासह राज्यावर पावसाबरोबरच येतेय ‘हे’ संकट; IMD चा अलर्ट काय?

हवामान विभागाने देशातील अनेक राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशातील काही भागात पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासाह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 14, 2025 | 06:48 PM
India Weather Forecast: देशासह राज्यावर पावसाबरोबरच येतेय ‘हे’ संकट; IMD चा अलर्ट काय?
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आणि देशातील अनेक राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. अवकाळी पावसाचा तडाखा अनेक भागात बसला आहे. कडक उन्हापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  गारपीटीमुळे देखील मोठे नुकसान झाले आहे.

मात्र पुन्हा एकदा हवामान विभागाने देशातील अनेक राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशातील काही भागात पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासाह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाबरोबरच वादळी वारे आणि गारपीट असे दुहेरी संकट येण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये गर वादळी वाऱ्यासाह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रतितास 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ओडिशा, आसाम, मेघालय आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

‘या’ भागात पारा 45 अंशाच्या पुढे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि अनेक भागात कडक उन्हाळा जाणवत आहे. मात्र सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाने उद्रेक मांडला आहे. अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचे चित्र दिसून येत आहे. जळगाव, भुसावळ भागात उष्णतेची लाट दिसून येत आहे. भुसावळ तालुक्यात तापमान 45 अंशावर जाऊन पोचले आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा पुन्हा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी

45 अंश तापमान हे सध्या राज्यातील सर्वाधिक तापमान मानले जात आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट असण्याचा अंदाज आहे. उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तापमान वाढलेले असल्याने नागरिकांनी घराबाहेर जाण्याचे टाळले आहे. सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईकरांसाठी पुढील दोन दिवस अत्यंत महत्वाचे

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत पुढील एक ते दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवरील जिल्हे, पालघर, ठाणे अशा जिल्ह्यांना देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा या भागात अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. तर राज्यातील इतर भागात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. यामुळे राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले असल्याचे म्हटले जात आहे. राज्यातील अनेक भागात अजूनही तापमान ४० अंशाच्या वर दिसून येत आहे.

Web Title: Imd alert to india and maharashtra for unseasonal rain next 5 days weather update news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • heavy rain update
  • imd
  • india
  • Weather forecast

संबंधित बातम्या

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर
1

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर

Maritime Dispute : जाफना समुद्रात तणाव; श्रीलंकेच्या नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना केली अटक आणि बोटही केली जप्त
2

Maritime Dispute : जाफना समुद्रात तणाव; श्रीलंकेच्या नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना केली अटक आणि बोटही केली जप्त

Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?
3

Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती
4

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.