१. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पत्ता निर्माण झाला आहे.
२. तेलंगणामध्ये पुढील ६ दिवस पावसाचा इशारा
३. ओडिशामध्ये मुसळधार पाऊस सुरू
नवी दिल्ली: पुन्हा एकदा देशभरात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील एक ते दोन दिवस उत्तराखंड राज्यात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व आणि मध्य भारतात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान आज भारतीय हवामान विभागाने देशातील कोणकोणत्या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलेलाआहे, त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
हिमाचल प्रदेशमध्ये देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या जोरदार पावसामध्ये डोंगरावरून दगड खाली आल्याने पंजाबमधील एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
2-wheeler owners haven’t woken up to the ethanol scam yet…
Coz most bikes/scooters don’t have digital odometers, the mileage isn't displayed, they have to calculate manually which most people don't do.
They’ll start realizing slowly once they observe that they are visiting… pic.twitter.com/GK3vi0oL1o
— Milan (@MilanBarsopia) August 10, 2025
दक्षिण भारतात मुसळधार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतात देखील काही राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तेलंगणा राज्यात पुढील ६ दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मध्यप्रदेश व ओडिशामध्ये काय असणार हवामान?
मध्यप्रदेश, विदर्भ, ओडिशा, छत्तीसगड आणि किनारी राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मेघालय आणि कर्नाटक राज्यात काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. कंदाची येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मध्यप्रदेशातील १७ जिल्हे कटनी, नरसिंगपूर, सिवनी, जबलपूर, छिंदवाडा, बालाघाट, मंडला, रेवा, सतना, दिंडोरी, सिधी, सिंगरौली, मौगंज, मैहर, अनुपपूर, शहडोल आणि उमरिया येथे आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, 13 ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तराखंडमध्ये हवामान कसे असणार?
उत्तराखंडमध्ये आज हवामान पुन्हा एकदा बिघडू शकते. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पिथोरागड, बागेश्वर, चमोली, पौडी गढवाल, रुद्रप्रयाग, टिहरी गढवाल, नैनिताल, चंपावत, अल्मोडा आणि उधम सिंह नगर येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पर्यटनाला यामुळे मोठा फटका बसला आहे. तसेच देवदर्शनासाठी गेलेले अनेक भाविक व पर्यटकांना देखील रेक्यु करण्याचे काम सुरु आहे.