1. देशभरातील वातावरणात सातत्याने होत आहे बदल
2. अनेक ठिकाणी मुसळधार
3. काही राज्यात पावसाने घेतली विश्रांती
India Heavy Rain Alert: देशभरात हवामान सातत्याने बदलत आहे. त्यामुळे काही ठिकाणी उकाडा तर काही ठिकाणी गार हवा जाणवत आहे. दरम्यान आज भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यात पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात. उतर प्रदेशमध्ये हवामान एकदम मोकळे आहे. तर अन्य राज्यांची स्थिती जाणून घेऊयात.
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. याचा परिणाम अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने काही राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. राजधानी दिल्लीत उकाडा वाढणार आहे. पुढील 5 दिवस दिल्लीत पावसाची शक्यता कमी आहे.
पर्वतीय राज्यांमध्ये मुसळधार पाऊस
राजधानी दिल्लीत उकाडा वाढत आहे, तर पर्वतीय राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हिमाचल प्रदेशमधील 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे . तर उत्तराखंडमधील डेहराडून, टीहरी आणि पिठोरागडसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
IMD Heavy Rain Alert: अरे बाबा आता थांब रे! उत्तराखंडमध्ये पाऊस करणार कहर; तर ‘या’ राज्यांमध्ये…
याचा परिणाम उत्तर प्रदेशवर देखील पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये देखील आज पाऊस कहर करण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील 11 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या हवामान पावसाळी असण्याचा अंदाज आहे. दरम्यान पर्वतीय राज्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतातील कही राज्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळे हवामान पाहायला मिळत आहे. पूर्वेकडील राज्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिहार, पूर्वेकडील राज्यांमध्ये देखील पावसाचा जोर अधून मधून राहण्याचा अंदाज आहे.
उत्तराखंडमध्ये पाऊस करणार कहर
उत्तराखंड राज्यात पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. उत्तरखंड राज्यात आज देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभगाने आज देखील डेहराडून, रुद्रप्रयाग, बागेश्वर, चमोली, पिठोरागाड या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 70 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आज देखील उत्तराखंड राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.