IMD Heavy Rain Alert: पावसाचा 'या' राज्यांमध्ये कहर; IMD च्या इशाऱ्याने वाढली चिंता, उत्तराखंडमध्ये तर...
उत्तरेकडील राज्यांमध्ये पुरस्थिती कायम
दिल्लीत काही पावसाची शक्यता कमी
आज देशभरात पाऊस होण्याचा अंदाज
India Weather Update: गेल्या काही दिवसांमध्ये देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजेच पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी स्थिती सामान्य झाली आहे. तर काही ठिकाणी अजूनही जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान आज भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिल आहे ते, जाणून घेऊयात.
दिल्लीत कसे असणार वातावरण?
गेल्या काही दिवसांमध्ये राजधानी दिल्लीत पावसाचा जोर कमी झाल्यासारखे पाहायला मिळत आहे. पुढील दोन ते तीन दिवस दिल्लीत पावसाचा जोर कमी असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशच्या लखनौ, प्रयागराज, रायबरेली, अमेठी, झांसी, कानपूर आणि अन्य जिल्ह्यात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तराखंड, जम्मू काश्मीर, पूर्वेकडील राज्ये, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल राज्यात देखील आज साधारण पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
उत्तराखंड राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच कर्नाटक राज्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 16 तारखेपर्यंत आसाम, मेघालय, नागालँड, मणीपुर, त्रिपुरा, मिजोराम राज्यात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
पूर्व आणि मध्य भारतातील बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, तर महाराष्ट्र, दक्षिण भारतात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, पुणे भागात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाने अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
IMD Rain Alert: पुन्हा धुमाकूळ! राज्यात पाऊस सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये करणार कहर
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.